December 12, 2024
Meet Akshaya Rane at WorldCamp Kolhapur to learn effective tips on feedback
Home » फीडबॅक संदर्भातील प्रभावी टीप्स जाणून घेण्यासाठी भेटा अक्षया राणे यांना वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

फीडबॅक संदर्भातील प्रभावी टीप्स जाणून घेण्यासाठी भेटा अक्षया राणे यांना वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये

कोल्हापूर – येथे ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये वर्डकॅम्पच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या तंत्रज्ञान विकासास हातभार लावण्यासाठी आयोजित होत असलेल्या या कार्यशाळेमध्ये अनेक नामवंत तज्ज्ञ आणि मार्गदर्शन सहभागी होणार आहेत. तुम्ही मॅनेजर असाल किंवा ज्युनिअर मेंबर, फीडबॅक देण्याचा प्रसंग हा येतोच. अशा वेळी आपण कशा पद्धतीने तयारी करावी, कसा फीडबॅक द्यावा, जेणेकरून समोरच्याला फायदा होइल हे समजून सांगण्यासाठी अक्षया राणे यांचे Unlocking the Power of Feedback हे सेशन WordCamp कोल्हापूरमध्ये आयोजित केले आहे. तरी याचा लाभ इच्छुकांनी घ्यावी, असे आवाहन वर्ल्डकॅम्पच्या संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

तुम्ही अनुभवी व्यवस्थापक असाल किंवा कनिष्ठ विकसक असा, अभिप्राय देणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. जे आपल्या करिअरच्या मार्गांना आकार देते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, केवळ 26 टक्के कर्मचाऱ्यांचा असा विश्वास आहे की त्यांना मिळालेला फीडबॅक त्यांच्या सुधारणेस हातभार लावतो. या महत्त्वपूर्ण संभाषणांमध्ये, भावना अनेकदा महत्त्वपूर्ण संदेश आणि तथ्ये वितरित करतात. या सत्रामध्ये सहानुभूतीसह प्रभावीपणे अभिप्रायाची रचना करण्याच्या व्यावहारिक अंतर्दृष्टीसह तुम्ही सुसज्ज होऊ शकला. तुमच्या व्यावसायिक प्रवासात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला सशक्त करण्यासाठी या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्या. संभाषणांना चातुर्याने कसे मार्गस्थ करायचे हे सुद्धा तुम्हाला येथे शिकता येईल.

अक्षरा राणे या व्यावहारिक उदाहरणांसह फीडबॅक फ्रेमवर्क यावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रतिक्रिया देताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात. फीडबॅकची तयारी कशी करावी ? आदी गोष्टीवर मार्गदर्शन करणार आहेत.

अक्षया राणे यांचा अल्प परिचय

अक्षया यांना वर्डप्रेसमधील दहा वर्षाहून अधिक अनुभव आहे. त्या स्वतः मल्टीडॉट्स या कंपनीमध्ये प्रकल्प व्यवस्थापक आहेत. https://akshayar.online.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading