कोल्हापूर – येथे ११ व १२ जानेवारी २०२५ दरम्यान वर्डप्रेसच्या व्यावसायिकांनी वर्डकॅम्पचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये वर्डप्रेसच्या वापरातील महत्वाचे मुद्दे, नवीनतम ट्रेंड्स आणि त्यासंबंधीच्या तंत्रज्ञान यावर सखोल चर्चा केली जाणार आहे. वर्डकॅम्प मधील सत्रामुळे वर्डप्रेसच्या वापरकर्त्यांना अनेक नवीन माहिती मिळेल आणि त्यांचे ज्ञान अधिक प्रगल्भ होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.
कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित या वर्डकॅम्पमध्ये वेबसाईटची गती संदर्भातील समस्या अन् उपाय यावर केतन निरुके मार्गदर्शन करणार आहेत. स्पीड ऑप्टिमायझेशन हॅक्स फॉर वर्डप्रेस असा त्यांचा विषय आहे. त्यांच्या सत्रात केतन वर्डप्रेसच्या भविष्याबद्दल, त्याच्या नवीनतम फिचर्स आणि टूल्स विषयी माहिती देणार आहेत.
वेबसाइटची गती महत्त्वाची का आहे आणि कोअर वेब व्हायटल्स वापरकर्त्याच्या अनुभवावर आणि शोध इंजिन रँकिंगवर कसा परिणाम करतात यावर केतन विशेष मार्गदर्शन करणार असून यात कोअर वेब व्हाइटल्सचा परिचय, वेबसाइटच्या गतीवर परिणाम करणारे प्रमुख घटक, वर्डप्रेस साइट गती कशी ऑप्टिमाइझ करावी, कोअर वेब व्हाइटल्स ऑप्टिमायझेशन, स्पीड आणि कोर वेब व्हाइटल्सचे निरीक्षण करण्यासाठीची साधने, वर्डप्रेस स्पीड ऑप्टिमायझेशनसाठी सर्वोत्तम प्लगइन यावर माहिती देणार आहेत.
केतन निरुके यांच्याबद्दल
केतन निरुके यांना वर्डप्रेस डेव्हलपमेंटमध्ये सात वर्षाहून अधिक अनुभव आहे. वर्डप्रेसच्या विविध पैलूंवर गहन ज्ञान आहे. ते वर्डप्रेसच्या वाईड इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग कसा करावा, त्याचे फिचर्स आणि ट्रेंड्स कसे सुसंगत करावेत याबद्दल आपल्या ज्ञानाचे आणि अनुभवाचे आदानप्रदान करणार आहेत.
वर्डकॅम्प कोल्हापूर 2025 चे महत्त्व
वर्डकॅम्प एक प्रमुख इव्हेंट आहे जो वर्डप्रेस समुदायाला एकत्र आणतो. या इव्हेंटमध्ये, सर्व वर्डप्रेस वापरकर्त्यांना, डेव्हलपर्सना आणि ब्लॉगर्सना एक मंच मिळतो जिथे ते नवीनतम माहिती, तंत्रज्ञान, आणि टिप्सवर चर्चा करू शकतात. वर्डकॅम्प कोल्हापूर 2025 या इव्हेंटमुळे कोल्हापूरमध्ये वर्डप्रेस समुदायाला एक नवा वेग मिळेल.
वर्डकॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.