देहू-आळंदी परिसरातील साहित्यप्रेमी, रसिक ग्रामस्थांनी साहित्य, कला आणि मराठी भाषा संवर्धनासाठी इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना केली आहे. या परिषदेच्यावतीने मोशी (ता.हवेली) येथे एकदिवशीय ‘इंद्रायणी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे तर स्वागताध्यक्षपदी संतोष बारणे यांची निवड करण्यात आली आहे.
हे साहित्य संमेलन मोशी येथे शनिवार दिनांक 24 डिसेंबर रोजी होणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अ.मा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. या साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रा. तुकाराम पाटील, शिवाजी चाळक, राज अहेरराव इत्यादी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील बहुतांश भाग औद्योगिक परिसर असल्याने जिल्ह्यात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यातही प्रजा आणि प्रतिभा बहरत आहे. कामगारांतील अनेक साहित्यिक प्रसिद्धीपासून दूर आहेत. कामगार वर्गातील या प्रतिभावान साहित्यिकांचा गौरव म्हणून, Moshi News) ज्येष्ठ साहित्यिक व कामगार नेते अरुण तुकाराम बोऱ्हाडे यांची या पहिल्याच इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आज (शनिवारी) चऱ्होली येथे इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष, इतिहास संशोधक संदीप भानुदास तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे यांनी मांडलेल्या या प्रस्तावास, ज्येष्ठ साहित्यिक व लोकसाहित्याचे अभ्यासक सोपान खुडे यांनी अनुमोदन दिले.
साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून साहित्यप्रेमी युवक सामाजिक कार्यकर्ते संतोष सिताराम बारणे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. अहेफाज मुलाणी यांनी मांडलेल्या या प्रस्तावास प्रा. विकास कंद यांनी अनुमोदन दिले.
संमेलनाध्यक्ष अरुण बो-हाडे यांचा परिचय : पण यांनी सुमारे पंचवीस वर्षे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीतील कामगार संघटनेचे नेतृत्व केले श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. कामगारांचे नेतृत्व करीत असतानाच त्यांची साहित्य सेवा चालू होती.(Moshi News) नवोदय, रानपाखरं अशी ही राजघाट कार्यकर्ता, माय माझी इंद्रायणी आणि चांदण्यांच्या अंगणात असे सहा कवितासंग्रह तसेच आमचे नेते आमची प्रेरणा, वेध सामाजिक जाणिवांचा, नाना पाटील गोगावले चरित्र (सहलेखक) इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा अक्षरप्रतिमेतील प्रज्ञावंत ही त्यांची दोन पुस्तके याच साहित्य संमेलनात प्रकाशित होणार आहेत. शिवाय काही पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. त्यांच्या साहित्यात श्रमसंस्कृती आणि अब्दसंस्कृतीचा मिलाफ पहावयास मिळतो. त्यांच्या पूर्वायुष्यात पत्रकारितेचा अनुभव असून, मराठी भाषेचे अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 2016 मध्ये मराठी भाषा राजभाषा दिन’ साजरा करण्यास सुरुवात झाली. तसेच ‘मराठी भाषा संवर्धन समितीने पुढाकार घेतला होता. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे माजी पदाधिकारी आहेत.
त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना सह्यादी साहित्य पुरस्कार (1998), साहित्य परिषदेचा प्रबोधन यात्री पुरस्कार (2002), शिवांजली साहित्य गौरव पुरस्कार (2016), नुकताच त्यांच्या वेध सामाजिक जाणिवांचा या पुस्तकाला मुंबईच्या मराठा मंदिर साहित्य संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.