February 6, 2023
Book Review of Prem Uthav by Navnath Rankhambe
Home » प्रेम उठाव परिवर्तन चळवळीच्या अंगाने जाणारा काव्यसंग्रह…..
मुक्त संवाद

प्रेम उठाव परिवर्तन चळवळीच्या अंगाने जाणारा काव्यसंग्रह…..

डॉ. आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष कराचा नारा दिला व्यसनापासून दूर राहा. परंपरावादी व्यवसाय सोडून नवा विचार अंगीकारावा, न्याय, समता, बंधुता याप्रमाणे माणसाचे वर्तन हवे अधिकाराबरोबर कर्तव्याची जाण हवी, याची जाणीव करून भारतीय संविधान देते. याचे भान प्रत्येक भारतीय कुटुंबाने ठेवले पाहिजे.

रमेश जावीर

गौरगाव, (तालुका – तासगाव , जि.- सांगली) नवकवी नवनाथ आनंदा रणखांबे यांचा प्रेम उठाव काव्यसंग्रह वाचनात आला. दलित वाङ्मय मध्ये कथा ,कविता, आत्मचरित्र वैचारिक लेख, कादंबरी, नाट्यलेखन इत्यादी माध्यमातून बरेच लेखन प्रकाशित झाले आहे. कवी नवनाथ रणखांबे यांचा प्रेम उठाव हा काव्यसंग्रह ठाणे येथून शारदा प्रकाशन तर्फे प्रकाशित करण्यात आला. या काव्यसंग्रहाला डॉ. प्रेरणा उबाळे (हिंदी मराठी कवियत्री, अनुवादक समीक्षक, हिंदी विभाग प्रमुख, मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे) यांची प्रस्तावना लाभली आहे. त्याचबरोबर प्राध्यापक डॉ. विठ्ठल शिंदे (माजी प्राचार्य) यांचेही प्रास्ताविकाचे दोन शब्द काव्यसंग्रहात व्यक्त झाले आहेत. डॉ. गंगाधर मेश्राम (कल्याण) यांनीही प्रास्ताविक स्वरूपात काव्यसंग्रहाबद्दल विचार मांडले आहेत.

बनाळी ( ता.- जत, जि. – सांगली) च्या प्राध्यापिका योगेश्री कोकरे यांनीही आपले विचार व्यक्त केले आहेत. या काव्यसंग्रहाला सतीश खोत यांचे मुखपृष्ठ लाभले आहे. मुखपृष्ठ बोलक आहे. पायातील श्रृंखला तोडून पक्षी भरारी मारतो आहे. मनगटावर साखळदंड जखडले आहेत. हातात लेखणी असून लेखणीच्या टोकावर प्रेमाचे प्रतीक आहे. या काव्यसंग्रहात 38 कविता देण्यात आल्या आहेत. नवनाथ रणखांबे यांचा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तीशी संपर्क आला आहे. त्या त्या वेळेला या कवी मित्रास ज्या ज्या व्यक्तींचे सहकार्य लाभले त्या त्या व्यक्तींचा नाम उल्लेख या कवितासंग्रहात दिलेला आहे.

महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांचा विचार वारसा कवी नवनाथ रणखांबे कवितातून मांडताना दिसतात. पती-पत्नी विवाह रुपाने एकत्रित येतात संसार करतात. पती जर परिवर्तनवादी चळवळीत असेल तर पत्नीने ही त्याला साथ द्यायला हवी. केवळ चूल आणि मूल असे न राहता घराचा उंबरा ओलांडून स्त्रिया बाहेर पडल्या पाहिजेत.

डॉ. आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष कराचा नारा दिला व्यसनापासून दूर राहा. परंपरावादी व्यवसाय सोडून नवा विचार अंगीकारावा, न्याय, समता, बंधुता याप्रमाणे माणसाचे वर्तन हवे अधिकाराबरोबर कर्तव्याची जाण हवी, याची जाणीव करून भारतीय संविधान देते. याचे भान प्रत्येक भारतीय कुटुंबाने ठेवले पाहिजे. मानवी स्त्री पुरुष प्रेमाबद्दल आज पर्यंत केवळ विरह वेदना ताटातूट एकतर्फी प्रेम मुक्त स्वैराचार संपत्ती संचय सौंदर्य याचाच विचार केलेला दिसतो. पण हे कवी नवनाथ रणखांबे यांना मान्य नाही. या काव्यसंग्रहातील कविता परिवर्तनाच्या दिशेने जाताना दिसतात. डॉ. आंबेडकरांची परिवर्तन चळवळ हे एक युद्धच आहे. पण हे युद्ध शांततेच्या मार्गाने जाणारे आहे. या चळवळीचे निशाण निळे आहे ‘अस्वस्थ’ या कवितेत ते म्हणतात , —

का अस्वस्थ करतेय
हे निखाऱ्याचे जग
का फुटत चाललाय
व्यक्त अव्यक्त भावनाचा
नाजूक बंध
ऐकू येतात मला
माझ्या आतल्या आवाजाच्या हाका
त्या म्हणतात मला
अरे उठ उठ

कवी नवनाथ रणखांबे ‘भीम बाबा’ या कवितेत म्हणतात,

बाबांचं बळ
आहे जवळ
विचाराची शाळा
प्रगतीचा डोळा
मार्ग सोहळा
फुलला प्रज्ञावंत मळा

कवीने परिवर्तन चळवळीमध्ये बाबासाहेबांचे विचार म्हणजे एक शाळा आहे असं म्हणतात.
कवीला पूर्वीचे जीवन आठवते आहे. पूर्वी उच्चभूषमाज खालच्या वर्गातील समाजावर अन्याय अत्याचार करत असत याची जाणीव कवीला आठवते आहे ‘ खुणा’ या कवितेमध्ये ते म्हणतात

जेव्हा जेव्हा पाहतो
ह्या जुनाट खुणा
तेव्हा तेव्हाच का
भळभळत राहतात
ह्या जखमा

कवी समाज मनाची ही वेदना आपली प्रेयसी पत्नीला करून देतो आहे याची जाणीव होते. चल उठ माझ्याबरोबर तुही लढायला तयार हो, ही प्रेरणा कवी देताना दिसतो
तर ‘जगणं’ या कवितेत कवी म्हणतो,

तुझ्यासोबत जगणं झकास आहे
तुझ्याशिवाय जगणं भकास आहे

कवितेच्या या दोन ओळी बरंच काही सांगून जातात स्त्री-पुरुष रथाची दोन चाके आहेत ही चाके पक्की असली पाहिजेत. स्त्री पुरुष विचाराचे एक हवेत. प्रत्येक पुरुषाचं आपल्या पत्नीबाबत असंच मत असतं. पण चळवळीच्या अंगाने जात असताना पत्नीने पतीला साथ दिलीच पाहिजे. असं काही सी भावना कवी रणखांबे यांच्या ‘प्रेम उठाव’ या काव्यसंग्रहातून दिसून येते.

काळ बदलतो आहे आपणही बदलायला हवे. इतर काही कविता मन .पत्ता ,पाऊस ,थेंब ,आभाळ होताना माय, टाकू नको डाव फसवा, इत्यादी कविताही चळवळीच्या अंगानेच जाताना दिसतात.

उठाव या कवितेत कवी म्हणतो ,
अबोल्याचा उठाव
सांग कुठपर्यंत ?
हृदयाची धडकन
बंद पडेपर्यंत !

हा जीवन संघर्ष अखंड चालत राहणार आहे ही भावना व्यक्त होताना दिसते. कवी नवनाथ रणखांबे लिखित प्रेम उठाव हा काव्यसंग्रह वरती खूप काही समीक्षण पेपर्स मधून आली आहेत. कवीचे लेखन दलित चळवळीच्या अंगाने जाणारे आहे . लेखन शैली चांगली. प्रयत्न खूप चांगला. सर्वात महत्त्वाचे कवीचा जनसंपर्क मोठा आहे. ही जमेची बाजू आहे. कवीच्या कवितेतील दोन ओळीचा आशय खूप काही सांगून जातो.

काव्यसंग्रहाचे नाव – प्रेम उठाव
कवी – नवनाथ रणखांबे, ठाणे
प्रकाशक – शारदा प्रकाशन, नवपाडा ठाणे. फोन नं. 9820176934
किंमत – 90 रुपये
काव्यसंग्रह मिळण्यासाठी संपर्क फोन नंबर :- 9137936728 /9967435032

Related posts

Neettu Talks : कोणते पदार्थ खायचे टाळायला हवेत ?

विविध प्राण्यांचे सहजपणे हुबेहुब आवाज काढणारी प्रयोगभूमीतील मंगल…

अंतर्मुख करायला लावणारा कथासंग्रह

Leave a Comment