April 1, 2023
aadhar-pratishthan-borgaon-literature-award
Home » आधार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

आधार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

डॉ. श्रीकांत पाटील यांच्या बालसाहित्यास पुरस्कार

बोरगाव (ता. तासगाव, जि. सांगली) येथील आधार प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती वाचनालयाच्यावतीने सुनिल लाड यांनी दिली आहे. शनिवारी ( ता. २९) ज्येष्ठ समिक्षक प्राचार्य सयाजीराजे मोकाशी (मायणी) व अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. एक हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या साहित्य पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कार विजेते असे –

१. उत्कृष्ट कादंबरी – पाऊसकाळ – लेखक विजय जाधव, ब्रह्मानंदनगर, सांगली
२. उत्कृष्ट कथासंग्रह – बारा गावचं संचित – लेखक जयवंत आवटे, कुंडल, सांगली
३. उत्कृष्ट कवितासंग्रह – दखल बेदखल – शिवाजी सातपुते, मंगळवेढा, सोलापूर
४. उत्कृष्ट व्यक्तिचरित्र – अरूणोदय – डॉ. स्वाती शिंदे – पवार, विटा, सांगली
५. उत्कृष्ट बालसाहित्य – सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल – डॉ. श्रीकांत पाटील, घुणकी, कोल्हापूर
६. उत्कृष्ट काव्यलेखसंग्रह – स्वप्नातल्या कळ्यांनो – प्रा. प्रकाश कुलकर्णी, मिरज, सांगली
७. उत्कृष्ट प्रेरणादायी साहित्य – यशपुष्प – डॉ. आशुतोष रारावीकर, परळ, मुंबई

Related posts

300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस

घटस्थापनेनिमित्त पंढरपूर विठ्ठल मंदिरात बांधलेली पुजा…

प्रदूषण निवारण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पाच नद्यांसाठी 1183 कोटी रुपये मंजूर

Leave a Comment