September 8, 2024
Remedies for Throat Infection Dr Mansi Patil article
Home » घशातील जंतुसंसर्ग यावर उपाय
मुक्त संवाद

घशातील जंतुसंसर्ग यावर उपाय

घशाचा दाह किंवा घशात खवखवणे ह्या आजाराला शास्त्रीय भाषेत फॅरेनजायटिस असे म्हणतात. म्हणजे जंतू दोष अथवा जंतुसंसर्ग होय हे सर्दी किंवा फ्लू प्रमाणेच घशाला होणारे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन काही दिवसांत आपोआप कमी होते.

घसा दुखणे किंवा खवखवणे, बोलताना किंवा गिळताना घसा दुखणे, गिळायला त्रास होणे, टॉन्सिल्सला सूज येऊन ते लाल होणे, टॉन्सिल्सवर पांढरे चट्टे उठणे किंवा त्यावर पस तयार होणे ही फॅरिन्जायटिसची कॉमन लक्षणे आहेत. घशाला हा त्रास होत असताना शरीर सुद्धा ह्या इन्फेक्शनची ताप, खोकला, नाक सतत वाहणे, अंगदुखी, डोकेदुखी, शिंका, मळमळ किंवा उलटी होणे ही लक्षणे दाखवत असते. मोठी माणसे हे सगळे काही प्रमाणात सहन करू शकतात. पण लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच गिळताना त्रास होतो आणि त्यामुळे सतत तोंडातून लाळ गळत असते. असे झाल्यास त्यांना त्वरित डॉक्टरांकडे नेणे आवश्यक आहे.

उपाययोजना

१) घशाची सूज उतरण्यासाठी आपल्याला गरम पाणी पिण्याचे व हळद मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.
२) सुंठ, गवती चहा, ज्येष्ठमध, हळद, पुदिना यांचा चहा करा लिंबू पिळून प्या.
३) घशाला झालेले इन्फेक्शन घालवण्यासाठी पेरूचे पान अत्यंत उपयुक्त आहे. पेरूच्या पानात आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. ते चाऊन अथवा उकळून रस प्या.
४) थंडीमध्ये घशाचे इन्फेक्शन होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. याच्या जोडीला येणारा ताप, सर्दी यामुळे आपण हैराण होऊन जातो. पण वाफ घेणे हा यारील सोपा उपाय आहे. घरच्या घरी गरम पाणी करुन त्याची वाफ घेतल्यास घशाला आराम पडतो. दिवसातून दोन ते ती वेळा हे केल्यास इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते.
५) घसा दुखत असल्यास काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. अशावेळी गरम काढा प्यायल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. काढा मध्ये तुळस, लवंग, आले घातल्यास घशासाठी तो जास्त उपयुक्त होतो. असा काढा दिवसातून २ वेळा घेतला तरी घशाला आराम मिळतो.
६) दोन मिऱ्याची पुड किंचित हळद, किंचीत काथाची पुड मधात घ्यावी.
७) काथाची फुड गरम पाण्यात घेतल्यास घसा सुटतो.
८) गरम पाण्यात एक लिंबू रस घ्यावा.
९) लसणाची पाकळी पिठी साखरेत घालून खायची.
१०) मध व जेष्ठीमध पावडर, व हळद, कोरफडीचा गर आवाजा साठी एकत्र करून चाटावा. दोन वेळा.
११) घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चावा. त्यामुळे तुम्हाला लवकरआराम मिळेल.
१२) आल्याचे चार तुकडे, दोन टोमॅटो, मध यांचा रस करुन प्या.
१३) पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोडयाथोड्या वेळाने प्या.
१४) मधात काही लवंगा टाका. काही तासांनी लवंगा काढून त्याचे चाटण खा. लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल.
१५) पाण्यात बडीसोप टाकून ते काही मिनीटे उकळा त्यानंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध टाकून थोड्या थोड्या वेळाने प्या.
१६) लिंबाचा रस व एक चमचा मध टाकलेले कोमट पाणी प्या.
१७) पुरेसा आराम करा. व्यवस्थित आराम केल्यामुळे शरीर इनफेक्शनला प्रतिकार करु शकते.

आयुर्वेदिक उपाययोजना

१) खदिरादी वटी एक एक गोळी खडीसाखरे सोबत. यामुळे घसा सुजणे, पडजीभ सुजणे, ढास लागणे, घशातील खवखव, खरखर, कफ न सुटणे, घसा लाल होणे यात आराम मिळतो.
२) एलादी वटी एक एक चार वेळा घेतल्यास ही लवकर फरक पडतो.
३) पोटातील अन्नरस घशात येऊन जळजळ आग आग होत असेल तर. जेवल्यानंतर अर्धा चमचा अविपत्तीकर चुर्ण थंड पाण्यात घ्या सोबत. व प्रवाळपंचामृत एक एक गोळी पाव कप दूधात घ्या. अनेक लोकांना घशाच्या जळजळीचा त्रास आहे टेस्ट नाँर्मल येऊन ही कारणं कळत नाही की घशात का जळजळ होतेय त्यानी हे उपाय केल्यास निश्चितच फरक दिसेल.

डाॅ. मानसी पाटील


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कुण्या गावचं आलं पाखरू….

महिलांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी झटणाऱ्या सोहनी डांगे

खाऊच्या पानांच्या वेलीची काळजी…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading