July 20, 2024
Climate favorable for rains in Maharashtra
Home » महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण अनुकूल
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण अनुकूल

पावसासाठी अति अनुकूल अशा मुख्य प्रणाल्यातून पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार दि.१३ जुलै पर्यन्त कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार, तर मराठवाड्यातील तसेच खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

या आहेत मुख्य प्रणाल्या –

i) मान्सूनचा मुख्य आस सरासरी जागेच्या दक्षिणेकडे स्थलांतर ✔️

ii)अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ पश्चिम किनारपट्टी समांतर समुद्रसपाटीला हवेच्या कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजे द्रोणीय आकारातील तटीय (‘ ऑफ-शोर-ट्रफ ‘ ) आसा चे अस्तित्व✔️

iii)अठरा डिग्री अक्षवृत्त समांतर, महाराष्ट्राच्या मध्यावरून जाणारा ३.१ ते ७. ६ किमी.उंचीवर हवेच्या साडेचार किमी. जाडीत  हवेचा कमी दाबाचा आस व त्यातून तयार झालेला वाऱ्यांचा शिअर झोन ✔️

iv)दक्षिण गुजराथ क्षेत्रात स. सपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत तयार झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती ✔️

माणिकराव खुळे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

‘अग्निपथ’ भर्ती मेळाव्याचे कोल्हापूर येथे आयोजन

संयुक्त राष्ट्राने मान्यता दिलेल्या प्रत्येक भाषेमध्ये हवा आपल्या प्रकाशनांचा विस्तार

शब्द ही विलीन झाले….!

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading