बाई..
आमच्या कडं नाही
ज्यात हॉल, बेडरूम, किचन, डायनींग
अस्सं सुसज्ज घर …
आमच्या कडे दगडाला कोंब फुटल
अस फक्त काळंभोर वावर …
आमच्या घरात घुसलं की,
गंगेवर भरलेल्या बाजारासारखी
इथं तिथं अस्ताव्यस्त बसलेली असतात सगळे
कोणी पलंगावर कलंडून
कोण्ही गव्हाच्या पोत्याला पाठ लावून
कोण्ही भुईवर मुटकुळं होऊन
बाया मात्र खुटू-रुटू करत बसतात …
मातीखालचे पेरले दाणे
फक्त पाणी मागत असतात ….
सुट्टीच्या दिवशी
बायकोबरोबर वावरात काम करतो
तीच असते पिकनिक
वर्षा दोन वर्षांनी जाऊन येतो
एसटी नं जेजुर, तूळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर
अन कधी कधी
मोटरसायकलवर वणीचा सप्तशृंगीचा गड
फक्त वावरातलं बाजारात विकलं नीट
तर जगणं होत नाही जड …..
संदीप जगताप
संपर्क – 7218625960
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.