October 25, 2025
संस्कृती दिवाळी अंक २०२५ हा स्त्री विशेषांक असून स्त्री चळवळीच्या ५० वर्षांचा प्रवास, संघर्ष, संवेदना आणि प्रेरणादायी लेखांनी सजलेला वाचनीय अंक आहे.
Home » ” संस्कृती ” दिवाळी अंकाने केले स्त्री चळवळीचे अर्धशतक अधोरेखित.
मुक्त संवाद

” संस्कृती ” दिवाळी अंकाने केले स्त्री चळवळीचे अर्धशतक अधोरेखित.

महिला केंद्रबिंदू ठेवून प्रकाशित केलेला हा दिवाळी अंक वाचनिय आहे. आतिल रेखाटन चित्रकार प्रतीक काटे यांनी काढलेली आहे तर मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी रेखाटले आहे. स्त्रीच्या अस्थित्वा बरोबरच वेदना, संवेदना आणि जाणीवा मुखपृष्ठातून उभे केले आहे. नक्कीच हा दिवाळी अंक महत्वाचा ठरणारा आहे.

प्रा. रामदास केदार
९८५०३६७१८५

संस्कार आणि संस्कृतीचे जतन करत घरात, दारात, रानात, वनात, शेतात राबराब राबून कष्ट कणा-या महिला, आपले धाडशी शौर्य दाखवून रणांगणावर इतिहास घडवणाऱ्या महिला, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, तंत्रज्ञानात यशाचे उंच शिखर गाठणाऱ्या महिला,सुखाच्या संसारासाठी कधी होरपळत तर कधी सहनशीलता जोपासत ओठांवरती आनंदाचे हसू फुलवणा-या सर्व महिला,अशा या विविध क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचे अंतरग म्हणजे यंदाच्या संस्कृती दिवाळी अंकाचे अंतरंग म्हणावे लागेल.

संस्कृती प्रकाशनच्या सुनिताराजे पवार यांनी स्त्री चळवळीला ५० वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांच्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.आणि तो अंकाच्या माध्यमातून यशस्वी मांडता आला आहे. स्त्री काल कशी होती आज कशी आहे आणि उद्या कशी असेल? हा या अंकाचा आत्मा आहे. स्त्रीया संघर्ष करत शिकल्या, सुधारल्या आणि हक्कासाठी लढे देण्यासाठी उभ्या राहू लागल्या. हे अनेक महिलांचे दाखले या अंकात वाचावयास मिळतात. या अंकात स्वतः संपादिका सुनिता राजे पवार यांचा वाचनीय लेख आहे. अठराव्या शतकात फ्रेंच राज्यक्रांती जगाच्या इतिहासात महत्त्वाची ठरली. समता, स्वतंत्रता आणि बंधुता या तत्वामुळे अनेक विचारवंताना विचारांची नवी क्षितिजे खुली झाली. या वैचारिक मंथनातून स्त्रीमुक्तीच्या आधुनिक कालखंडाची सुरवात झाली अशा त्या लिहितात.

स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील महिला चळवळी व संघटना याचा आढावा डाँ. मंदा खांडगे यानी घेतलेला आहे. १९९२ ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. तर १९९४ ला झालेली घटना दुरुस्ती या स्त्रीविषयक कार्याला चालना देणार्‍या घटना घडलेल्या आहेत अशा मंदा खांडगे लिहितात. व्यवस्थेतल्या बाईपणामुळे व पुरुषपणामुळे गाडल्या गेलेल्या भावनांना मुक्त करत नवीन अनुभवांना दोघांनाही स्वाघतशीलपणे सामोरे जायला हवं अशा डाँ. गिताली लिहितात. आज समकालीन स्त्री साहित्यातील दृश्यकला संवेदन हे तिच्या ख-याखु-या सहजतेने प्रकटन ठरते. अशा डाँ. निलिमा गुंडी लिहितात.

अश्विनी धोंगडे यांनी स्त्रीची भाषा शोधण्यचा प्रयत्न केलेला आहे. अंजली कुलकर्णी यांनी स्त्री कविता एक निरंतर नित्यनूतन वाहता प्रवाह या लेखातून वेगवेगळ्या कवियत्रीने मांडलेल्या वेदना आणि संवेदना व्यक्त कशा केलेल्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉ सुजाता शेणई यांनी प्रेरक स्त्रियांचा प्रभाव हा लेख वाचनीय असा लिहिलेला आहे. अँड नीलिमा म्हैसूर यांनी स्त्री हक्कांची वाटचाल न्यायालयीन निवाड्यांचे मैलाचे दगड हा कायदेविषयक महत्त्वाची माहिती देणारा लेख लिहिला आहे.

डॉ वंदना जोशी यांचा अधिकारी स्त्रियांची कर्तव्यसाधना हा लेख लिहिला आहे. स्त्री चळवळीचा ग्रामीण संसर्ग या लेखातून स्त्री पुरुषांचा समंजस सुसंवाद होणं गरजेचं असताना स्त्रीवादाचा, स्त्रीच्या माणूसपणाचा खरा अर्थ समजून घेतला जात नाही. अशा कल्पना दुधाळ लिहितात. स्त्रियांच्या आत्मचरित्रांमधून उलगडणारा समाज कसा असतो हे उज्वला गोखले लिहितात. कायदा आणि स्त्री चळवळीचे सहबंध हा स्त्रियांच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा लेख अँड शुभांगी दळवी यांनी लिहलेली आहे. डॉ केशव देशमुख यांचा अरण्यवती वंगारी मथाई, प्रा. अविनाश फडतरे यांचा मायदेशी महिलांची प्रेरणा चेतना भाभी हा लेख, संजय ऐलवाड यांचा जागतिक जनजागृतीची बालदूत लिसिप्रिया कंगुजम यांची जगव्यापी चळवळ अधोरेखित केली आहे.

स्वप्नील पोरे यांनी भरजरी प्रवास ऋचा बोंद्रे हिच्या स्वर, गीत संगीतातील प्रवास मांडलेला आहे. बुद्धी बळाची राणी दिव्या देशमुख हा खेळाबद्दल मिळवलेल यश कसे संपादन केले ते या लेखातून आलेले आहे. शिरीष चिटणीस यांनी सरोजिनी नायडू यांचे भारताच्या स्वातंत्र्याचा लढा चार वेळा तुरुंगात गेलेल्या नायडू यावर प्रकाश टाकला आहे. याचबरोबर स्त्री पात्र असलेल्या भारत सासणे, जगदीश कदम, डॉ राजेंद्र माने, बाळासाहेब लबडे, नीलिमा बोरवणकर, भास्कर बंगाळे, शशिकांत काळे, आरती देवगावकर यांच्या कथा वाचनीय आहेत. जोत्सना चांदगुडे, रमण रणदिवे, प्रा. रामदास केदार, देविदास सौदागर, शशिकांत हिंगोणेकर,अंजली ढमाळ, सचिन बेंडभर, प्रदीप कांबळे ,रंजना सानप, मृणालिनी कानटकर आदिंच्या कविता स्त्रीच्या जगण्याचा वेध घेणाऱ्या आहेत. महिला केंद्रबिंदू ठेवून प्रकाशित केलेला हा दिवाळी अंक वाचनिय आहे. आतिल रेखाटन चित्रकार प्रतीक काटे यांनी काढलेली आहे तर मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी रेखाटले आहे. स्त्रीच्या अस्थित्वा बरोबरच वेदना, संवेदना आणि जाणीवा मुखपृष्ठातून उभे केले आहे. नक्कीच हा दिवाळी अंक महत्वाचा ठरणारा आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading