November 22, 2024
Shabdgandhs state-level love poetry writing competition announced
Home » शब्दगंध च्या राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
काय चाललयं अवतीभवती

शब्दगंध च्या राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

शब्दगंध च्या राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

अहिल्यानगर : “ नवोदितांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी “ शब्दगंध च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेमध्ये पाथर्डी येथील सचिन चव्हाण प्रथम,गुहा येथील क्रांती करंजगीकर द्वितीय तर चांदूरबाजार येथील विशाल मोहोळ यांना तृतीय क्रमांका पटकावला आहे,” अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.

कवयित्री शर्मिला गोसावी, स्वाती ठुबे, राजेंद्र फंड यांनी काव्यलेखन स्पर्धा परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा..
प्रथम – सचिन चव्हाण,पाथर्डी
द्वितीय – क्रांती करंजगीकर, गुहा ता. राहुरी
तृतीय – विशाल मोहोळ, चंदुरबाजार जि. अमरावती
उत्तेजनार्थ – डॉ. राजेंद्र गवळी, कुकाणा, ता.नेवासा
उत्तेजनार्थ – सुजाता रासकर, देवदैठण, ता.श्रीगोंदा
उत्तेजनार्थ – रितेश सरोदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाली ता. आष्टी

स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १,००० रुपये, द्वितीय क्रमांकास ७५१ रुपये, तृतीय क्रमांकास ५५१ रुपये तर उत्तेजनार्थ दोघाना २५१ रुपये रोख स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक भेट असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. पारितोषिक प्राप्त साहित्यिकांचे मार्गदर्शक ज्ञानदेव पांडूळे, प्राचार्य जी. पी. ढाकणे, अध्यक्ष राजेंद्र उदागे,कार्याध्यक्ष डॉ. अशोक कानडे, कार्यवाह सुभाष सोनवणे, खजिनदार भगवान राऊत, अजयकुमार पवार,शाहिर भारत गाडेकर, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, सुनील धस, डॉ. तुकाराम गोंदकर, बबनराव गिरी, राजेंद्र पवार, रामकिसन माने, किशोर डोंगरे, बंडूशेठ दानापुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे, डॉ. प्रवीण गायकवाड व डॉ. प्रियांका गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading