कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात चार नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना पूर्णतः ऑनलाईन स्वरूपात सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती प्र. संचालक प्रा. डॉ. के. बी. पाटील यांनी दिली.
हे आहेत नवीन अभ्यासक्रम…
- सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर अकाउंटिंग
- सर्टिफिकेट कोर्स इन डिजिटल मार्केटिंग
- सर्टिफिकेट कोर्स इन बेसिक्स ऑफ अकाउंटिंग
- सर्टिफिकेट कोर्स इन फंडामेंटल्स ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट
हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्ये प्राप्त करून देऊन नोकरीच्या आणि व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देतील. अभ्यासक्रमांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे – पूर्णतः ऑनलाईन शिक्षण पद्धती, रेकॉर्डेड अध्ययन साहित्य, विषयतज्ज्ञांशी चर्चा, ऑनलाईन संपर्क सत्रे, ऑनलाईन मूल्यमापन आणि अत्यंत माफक शुल्क. त्यामुळे विद्यार्थी घरबसल्या आणि नोकरी-व्यवसाय सांभाळून हे अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.
अभ्यासक्रम निहाय अधिक माहितीसाठी संबंधित समन्वयकांशी संपर्क साधावा
- कॉम्प्युटर अकाउंटिंग: डॉ. सुशांत माने – ८७६६८५६४९९
- डिजिटल मार्केटिंग: डॉ. केतकी पोवार – ९३७०५०७३५३
- बेसिक्स ऑफ अकाउंटिंग: प्रा. प्रियांका सुर्वे – ९४०३८५०४५०
- फंडामेंटल्स ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट: डॉ. नगीना माळी – ८९७५२९५२९७
या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंग, अकाउंटिंगची मूलतत्त्वे, फायनल अकाउंटिंग कौशल्ये, तसेच प्रभावी व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. संचालक डॉ. के. बी. पाटील यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.