थंडीमुळे आता मोहोरला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अशा कालावधीत बागायतदारांनी कोणती काळजी घ्यावी ? तर थंडीमध्ये केळी बागांमध्ये कोणती काळजी घ्यावी याबाबत कृषी सल्ला…
🥭आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रक
1️⃣फवारणी- पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी, डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.९ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होते.
2️⃣फवारणी- बोंगे फुटताना, लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
या फवारणीमध्ये भुरी नियंत्रणासाठी, हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम; तसेच ढगाळ, पावसाळी वातावरण असल्यास, करपा नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे.
3️⃣फवारणी- दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, ब्युप्रोफेझीन (२५ एससी) १.२५ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीवेळी कीटकनाशक द्रावणामध्ये भुरी नियंत्रणासाठी, हेक्झाकोनझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे मिसळून वापरावे. हेक्झाकोनॅझोल उपलब्ध नसल्यास, सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम; तसेच ढगाळ, पावसाळी वातावरण असल्यास, करपा नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे.
4️⃣फवारणी- तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
5️⃣फवारणी- चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, डायमेथोएट (३० ईसी) १ मि.लि. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
6️⃣फवारणी- पाचव्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, (तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर असल्यास) पाचव्या फवारणीसाठी सुचविलेल्या कीटकनाशकांपैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
थंडीत केळी पिकाची घ्यावयाची काळजी
थंडीचा लहान रोपांवर होणारा परिणाम होतो. थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या रोपांच्या वाढीवर परिणाम होतो. काहीवेळा पाने उमलण्यास वेळ लागतो. पाने पिवळी पडतात. जमिनीतून अन्नद्रव्य उचलण्याचा वेग मंदावून झाडाच्या वाढीवर परिणाम होतो.
✨ उपाययोजना
👉🏽१९-१९-१९ हे विद्राव्य खत १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यास वेग वाढतो. त्याचा झाडांच्या वाढीसाठी चांगला परिणाम होतो.
👉🏽बागेत पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे.
👉🏽तीन ते चार महिने वयाच्या झाडाला २०० ग्रॅम आणि सहा महिने वयाच्या पुढील झाडाला अर्धा किलो निंबोळी पेंड आळ्यात मिसळून द्यावी. यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रात उबदारपणा वाढतो.
👉🏽पहाटेच्या वेळेस बागेत शेकोटी करून धूर करावा. यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होते.
👉🏽बागेच्या कडेने शेडनेट लावल्याने थंड वारे शिरण्यास अडथळा तयार होतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
