August 21, 2025
"Veteran playback singer Uttara Kelkar honored with Arun Paudwal Kritagyata Gaurav Puraskar 2025 for her musical legacy"
Home » ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना स्व.अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार 2025
मनोरंजन

ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना स्व.अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार 2025

मुंबई – सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा ” कृतज्ञता गौरव पुरस्कार ” यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे.

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थिती मध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येईल. हा समारंभ अनुराधाजींच्या खार (पश्चिम) येथील राहत्या घरी होणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रुपये 51,000 /- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळ्याचे हे यंदाचे 28 वे वर्ष आहे.

आजवर या पुरस्काराने सन्मानित झालेले मान्यवर असे ….

पार्श्वगायक- जी. मल्लेश , संगीतकार – राम कदम, यशवंत देव , प्रभाकर जोग, दत्ता डावजेकर, अशोक पत्की, संगीत संयोजक – श्यामराव कांबळे, तालवादक – जयसिंग भोई, प्रमोद साने, संतूर वादक – उल्हास बापट, गीतकार – जगदीश खेबुडकर, शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर, भावगीत गायक – अरुण दाते, गिटार वादक- रमेश अय्यर, सुनील कौशिक, ध्वनिमुद्रक – डी. ओ. भन्साळी, अविनंदन टागोर, हेमंत पारकर, सत्येन पौडवाल, युवा गायक – गिरीश संझगिरी, चंद्रशेखर महामुनी, मदन काजळे, त्यागराज खाडिलकर…

ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचा परिचय –

उत्तरा केळकर यांनी अर्थशास्त्र या विषयात B. A. ची पदवी घेतली असून मुंबई विद्यापीठातून शास्त्रीय संगीताचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित फिरोज दस्तूर यांच्या कडे त्यांनी शास्त्रीय रागदारी संगीत शिक्षण घेतले तर सुगम संगीताचे शिक्षण मराठीमधील ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव व श्रीकांत ठाकरे यांच्याकडे घेतले. त्यांच्या गायन कारकिर्दीला 53 वर्षे पूर्ण झाली असून या कालावधीमध्ये आजवर त्यांनी 12 विविध भाषांमध्ये 425 हुन अधिक चित्रपटांसाठी, 650 हुन अधिक कैसेट्स व सीडीज साठी तसेच अनेक शॉर्ट फिल्म्स, जाहिराती व जिंगल्स साठी पार्श्वगायन केले आहे. त्यांच्या गायन कारकिर्दीवर आधारित “उत्तर रंग” हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले असून त्यांनी त्यांच्या गायनाचे देशात व परदेशात अनेक जाहीर कार्यक्रम सादर केलेले आहेत.

उत्तरा केळकर यांची गाजलेली काही गीते –

01 सत्यम शिवम सुंदरा – सुशीला – राम कदम
02 अग नाच नाच राधे – गोंधळात गोंधळ – विश्वनाथ मोरे
03 झन झन नन छेडील्या तारा – हळदी कुंकू – विश्वनाथ मोरे
04 भन्नाट रानवारा – कशासाठी प्रेमासाठी – सुधीर मोघे
05 मंदिरात अंतरात तोच – धाकटी सून – सुधीर फडके
06 गडद जांभळ भरलं आभाळ – एक होता विदुषक – आनंद मोडक
07 येशील येशील राणी – पोरींची कमाल बापाची धमाल – यशवंत देव
08 कुणीतरी येणार येणार ग – अशी ही बनवा बनवी – अरुण पौडवाल
09 बहिणाबाई ची गाणी – यशवंत देव
10 देवांचाही देव करितो – आई – विश्वनाथ मोरे
11 बिलन शी नागीन निघाली – परिश ठाकूर
12 अशी चिक मोत्याची माळ – परेश शाह
13 चला जेजुरी ला जाऊ – नवरा माझा नवसाचा – जितेंद्र कुलकर्णी

मिळालेले सन्मान व पुरस्कार –

महाराष्ट्र राज्य शासनाचा “सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार” – 2 वेळा
सूर सिंगार संसद चा प्रतिष्ठित “मिया तानसेन पुरस्कार”
उमेद पुरस्कार, कोकण रत्न पुरस्कार, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, राम कदम पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार इ.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading