📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 15, 2026
मुक्त संवाद

बालमनावर करमणुकीची झालर पांघरणारा बालकाव्यसंग्रह – ढगोबा ढगोबा

Cover page of Marathi children poetry book Dhagoba Dhagoba by Surekha Wadkar

उत्कृष्ट मुखपृष्ठ, चांगल्या प्रतीची पाने, कवितेला साजेशी चित्रे सहजपणे केलेली शब्दांची उधळण या सा-यातून कविता हळूहळू सरकत सरकत पुर्णत्वाकडे घेऊन जाते. पहिल्याच प्रयत्नात केलेल्या कवितांची मांडणी पुढे बालसाहित्यिका म्हणून कवयित्रींना नक्कीच ओळख करून देतील यात शंकाच नाही.

बा. स. जठार गारगोटी
9420436256


साहित्य क्षेत्रातील तिसरे अपत्य तेही बालकाव्य लिहीणाऱ्या इचलकरंजी येथील कवयित्री सुरेखा वाडकर यांचा ढगोबा ढगोबा हा बालकाव्यसंग्रह प्रकाशित होत आहे.

मुलांप्रमाणे प्राण्यांची ही शाळा असते मात्र ती वाघ, सिंह हत्ती, लांडगा, कोल्हा, ससा यांच्याशिवाय पूर्णत्वास येत नाही अशा जंगल मंगल शाळेपासून या पुस्तकातील सुरेखाताईचा बालप्रवास सुरू होतो.

मुलांना आवडणारा जंगलमेवा आणि वनराजाची भीती या दोहोंतील विरोधाभास टिपण्याचा कवयित्रींचा बालमनानुरुप प्रयत्न सफल झाल्याचे जंगल या कवितेतून दिसून येते. जंगल सफर करताना प्रत्येक प्राण्यांच्या यथायोग्य वैशिष्टयानुरुप वर्णन वाचताना चेहरे हसरे होणार नाहीत हे अशक्यच…. झाडांचा मेवा खाताना होणारी कही खुशी कही गम अगदी मोजक्याच शब्दात मांडत कवयित्रीने कवितेला बालवाचकाच्या हदयात नकळत कशी पाठवली हे कळतही नाही.

ढगोबा ढगोबा ही बालकविता तर शीर्षकाला शृंगाराने सजवून टाकते याची जाणिव होते. यात कवयित्री म्हणतात,
ढगोबा ढगोबा
सांग मला जरा
कशा सोडतोस
तू या जलधारा
या कवितेत अनेक प्रश्नांची सरबत्ती करत ढगाला रडायला लावणाऱ्या शीर्षक कवितेचा वेगळाच ढंग दिसून येतो. या कवितेला आकार देणारे कवयित्रीचे कसब नावाजण्यासारखे आहे. चांदोमामा या कवितेत त्याच्याशी असलेले बालकाचे जिव्हाळ्याचे नाते बाळबोध शब्दात मांडताना कवितेचा शेवट बालमनाची संवेदनशीलता जाणवून देतो,


चांदोबा चांदोबा
सांग तूच मला
खाली मला सोडून
वर का तू गेला
वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट, गोळ्या यांच्या सहाय्याने सजवलेला चॉकलेटचा बंगला, नदीबरोबर खेळताना तिच्या उपकाराची जाणिव ठेवत खेळलेला खेळ, बालकांच्या नजरेतून केलेले बाहुलीचे वर्णन, भाज्यांची वैशिष्टये सांगत – सांगत बालमनावर रुळणाऱ्या कविता यशस्वी करण्यात कवयित्रीने शब्दांची बऱ्यापैकी मेहनत घेतल्याचे जाणवते. बाबाची थोरवी, परीताईचे जग, डोळ्यांच्या झरोक्यातून पाहिलेलं बाळाचे जग अशा आशयाच्या कवितांचा प्रवास करत करत कवयित्री शाळाच बघायला येण्याचे निमंत्रण देते,
अशी माझी शाळा
मला तिचा लळा
पहाण्यास या रे
सारे माझी शाळा
खडू, सुट्टी, मामाचा गाव, आगगाडी, मामाची वाडी, जत्रा, झेंडा, नको सुट्टी अशा अनेक विषयातून बालकविता फुलत फुलत मनाला खिळवून ठेवते.

उत्कृष्ट मुखपृष्ठ, चांगल्या प्रतीची पाने, कवितेला साजेशी चित्रे सहजपणे केलेली शब्दांची उधळण या सा-यातून कविता हळूहळू सरकत सरकत पुर्णत्वाकडे घेऊन जाते.
पहिल्याच प्रयत्नात केलेल्या कवितांची मांडणी पुढे बालसाहित्यिका म्हणून कवयित्रींना नक्कीच ओळख करून देतील यात शंकाच नाही. त्यांच्या भावी साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देऊन

पुस्तकाचे नाव – ढगोबा ढगोबा
कवयित्री – सौ. सुरेखा वाडकर
प्रकाशक – न्यू अथर्व पब्लिकेशन, रुई इचलकरंजी (8805112794)
पृष्ठे – 52, किंमत – ₹ 80

Related posts

झाडीबोलीचे सौंदर्य आणि साहित्यिक मूल्य वाढविणारा कवितासंग्रह

पकाल्यामध्ये ग्रामीण भागातील जीवनाचे दाहक वास्तव

खलिस्तानची चळवळ कशी उभी राहीली अन् त्याचे पडसाद याचे परखड विवेचन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar