October 4, 2023
viral-jokes-rajan-konvadekar-phulbaja
Home » कोडगेपण
व्हायरल

कोडगेपण

फुलबाज्या – राजन कोनवडेकर

कोडगेपण…

कोरोना महामारीने माणसांचे मृत्यू होत आहेत. असे असताना स्वतःला नेते म्हणवणारे वाढदिवस व कुठल्यातरी निवडणुकीत जिंकल्याच्या अभिनंदनाच्या जाहीराती देण्यात धन्यता मानत आहेत अशा पुढाऱ्यांच्या कोडगेपणास…

कोविड महामारीत यांचे
कोडगेपण हसू लागले
कामात कमी नेते जास्त
जाहिरातीत दिसू लागले

राजन कोनवडेकर
खोट

पराचा कावळा आणि
कुसळाचं मुसळ करण्यात
विरोधकांना बळ येते ।
सरकार चांगले चालले तर मात्र
यांच्या पोटात
राहून राहून कळ येते ।।

राजन कोनवडेकर

गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने…

पत्रिका

गोकुळात नेत्यांच्या
वारसदारांची चंगळ आहे
कार्यकर्त्ये वाऱ्यावर
त्यांच्या कुंडलीत मंगळ आहे…

राजन कोनवडेकर

Related posts

नावाला कशासाठी जपायचं…

लग्न आणि नोकरी

घरातला पिज्जा

Leave a Comment