कोल्हापूर : जागतिक स्तरावर ओपन-सोर्स वेब तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या WordCamp Kolhapur 2026 या महत्त्वाच्या परिषदेच्या आयोजनासाठी मीडिया पार्टनर म्हणून सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वर्डप्रेस, डिजिटल मीडिया, वेब डेव्हलपमेंट आणि कंटेंट क्रिएशन क्षेत्राशी संबंधित माध्यम संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.
वर्डकॅम्प ही वर्डप्रेस समुदायाची अधिकृत परिषद असून, येथे वेबसाइट निर्मिती, कंटेंट मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), सायबर सुरक्षा, ओपन-सोर्स तत्त्वज्ञान आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. तंत्रज्ञान, ज्ञानवाटप आणि ओपन-सोर्स संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या महत्त्वाच्या उपक्रमाचा भाग बनण्यासाठी कोल्हापूरसह राज्य व देशभरातील माध्यम संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
WordCamp Kolhapur 2026 काय आहे?
WordCamp ही वर्डप्रेस समुदायाची अधिकृत परिषद असून, जगभरात विविध शहरांमध्ये तिचे आयोजन केले जाते. WordCamp Kolhapur 2026 हे दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ रोजी कोल्हापूर येथे होणार आहे. या परिषदेमध्ये देशभरातील वेब डेव्हलपर्स, डिझायनर्स, ब्लॉगर, कंटेंट क्रिएटर्स, डिजिटल मार्केटर्स, स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.
मीडिया पार्टनर म्हणून कोण अर्ज करू शकतो ?
या उपक्रमासाठी पुढील माध्यम संस्थांना अर्ज करता येणार आहे –
ऑनलाइन न्यूज पोर्टल्स
ब्लॉग्स व डिजिटल मॅगझिन्स
यूट्यूब चॅनेल्स
पॉडकास्ट्स
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स
तंत्रज्ञान व डिजिटल विषयांवर काम करणारी माध्यमे
मीडिया पार्टनरना मिळणाऱ्या संधी
WordCamp Kolhapur 2026 साठी निवड झालेल्या मीडिया पार्टनरना –
- अधिकृत संकेतस्थळावर लोगो व मीडिया माहिती
- सोशल मीडियावर प्रमोशन
- कार्यक्रमाचे विशेष मीडिया पास
- वक्ते, आयोजक व सहभागींच्या मुलाखती
- परिषदपूर्व, परिषददरम्यान व परिषदपश्चात कव्हरेजची संधी
- टेक्नॉलॉजी व ओपन-सोर्स समुदायाशी नेटवर्किंग
- अशा विविध लाभांचा लाभ मिळणार आहे.
अर्ज कसा कराल?
मीडिया पार्टनर म्हणून सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी
👉 https://kolhapur.wordcamp.org/2026/call-for-media-partners/
या अधिकृत लिंकवर जाऊन आपला अर्ज सादर करावा, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
डिजिटल मिडियासाठी सुवर्णसंधी
तंत्रज्ञान, ज्ञानवाटप आणि ओपन-सोर्स संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपक्रमात सहभागी होण्याची ही मीडिया संस्थांसाठी सुवर्णसंधी आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि देशभरातील डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी पुढे यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
