📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 28, 2026
काय चाललयं अवतीभवती

साहिल बिबवे, भाग्यश्री भंडारी शिवनेरी मॅरेथॉनमध्ये प्रथम

Runners participating in Shivneri Marathon near Shivneri Fort in Junnar

जुन्नर : शिवजयंती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत, थरार, रोमांच आणि प्रचंड जिद्द या सर्वांचा सुरेख संगम घडवत जुन्नरच्या निसर्गरम्य वातावरणात रविवारी (दि.15) रोजी चौथी शिवनेरी मॅरेथॉन अतिशय उत्साहात पार पडली.

देश – विदेशातून आलेल्या हजारो धावपटूंनी शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन,मोरडे फूड्स आणि पोल्ट्री ब्रिडर्स कोऑर्डिनेशन कमिटी यांच्यावतीने आयोजित शिवनेरी मॅरेथॉनचा थरार अनुभवला. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांत २१.१ किलोमीटर पुरुष गटात साहिल बिबवे तर महिला गटात भाग्यश्री भंडारी हिने प्रथम क्रमांक पटकावला.तर केनियाचा चेरुय्योट टू हा ७३ मिनिट ३१ सेकंद वेळ नोंदवत सर्वाधिक वेगवान खेळाडू ठरला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंतीच्या आदल्या रविवारी शिवनेरी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करुन मॅरेथॉनला प्रारंभ झाला. ५, १० व २१.१ किलोमीटर या तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांना मानवंदना देण्यासाठी आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन शिवजन्मभूमीचे माजी आमदार अतुल बेनके, नागपूर परिमंडळचे माजी पोलीस महासंचालक डॉ.दिलीप पाटील भुजबळ,मोरडे फूड्सचे हर्षल मोरडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या हस्ते झाले.

या २१.१ किलोमिटर हाफ मॅरेथॉनमध्ये साहिल बिबवे याने ७८ मिनिट ८ सेकंद,तर भाग्यश्री भंडारी हेने ९३ मिनिट ७ सेकंद ही वेळ नोंदवली. दहा किलोमिटर अंतर गटात पुरुषांत स्वप्निल डोंगरे ३६ मिनिट ३१ सेकंद तर महिलांमध्ये साक्षी भंडारी ४१ मिनिट ५१ सेकंद वेळ नोंदवून पहिले आहे.सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देवून गौरविण्यात आले.

किल्ले शिवनेरी परिसरातील मॅरेथॉन मार्गावरील कुसुर, वडज, पारुंडे, काटेडे आणि येणेरे या गावांच्या दुतर्फा असलेली रंगीबेरंगी फुलांची, हिरवीगार भाजीपाल्याची शेती धावपटूंचा उत्साह द्विगुणित करत होती. यामध्ये जुन्नर व परिसरातील स्पर्धकही मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. अबालवृद्ध धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेऊन शारीरिक क्षमता आणि जिद्दीचा आदर्श घालून दिला. मुख्य आयोजकांसह शिवाई देवी मंदिर ट्रस्ट, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, जयहिंद शैक्षणिक संकुल आदी संस्थांच्या सहयोगाने ही स्पर्धा सुरक्षित व यशस्वीपणे पार पडली. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी स्पर्धा मार्गावर दुतर्फा उभे राहून टाळ्यांचा कडकडाट, ढोल-ताशांचा गजर आणि ‘हाऊ इज द जोश’च्या घोषणा देत धावपटूंचा उत्साह वाढवला.

आकर्षक वेशभूषा आणि अनोखा पाहुणचार

मॅरेथॉनमध्ये काही स्पर्धकांनी आपल्या अनोख्या वेशभूषेने लक्ष वेधून घेतलं. नऊवारी साडी, मावळा, वारकरी अशा वैविध्यपूर्ण वेशभूषांमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला. संभळ, ढोलताशे, लेझीम या पारंपारिक वाद्यांनी वातावरणात आणखी रंग भरले. अनेक धावपटूंनीही वाद्यांवर ठेका धरत आनंद व्यक्त केला. तर ज्वारीपासून तयार केलेले नाश्त्याचे पदार्थ, थेट शेतातून धावपटूंना उपलब्ध केलेले ताजे द्राक्ष, स्ट्रॉबेरी, केळी, चिक्की इ खाद्यपदार्थ, फिजिओथेरपी डॉक्टरांचे पथक असो वा धावपटूंच्या मदतीसाठी तैनात असलेले ४०० हून अधिक स्वयंसेवक. जुन्नरकरांनी केलेल्या या पाहूणचाराने धावपटू भारावून गेले.

Related posts

गाईच्या शेणापासून उत्पादित विषाणूरोधी घटक रोखते वस्त्रावर विषाणूंची वाढ

पूरबुडीत क्षेत्रामध्ये उसाला सक्षम पर्याय शर्कराकंद उत्पादनाचा

ब्रह्मराज देसाई स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406