June 16, 2025
Poster announcing Yogita Mali State-Level Poetry Award by Anubandh Foundation in memory of the late Yogita Mali
Home » कै . योगिता माळी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

कै . योगिता माळी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – येथील अनुबंध प्रतिष्ठानच्यावतीने कै. योगिता माळी यांचे स्मृतिपित्यर्थ उत्कृष्ठ काव्यसंग्रहास पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. तरी साहित्यप्रेमी व प्रकाशकांना काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन विलास माळी यांनी केले आहे.

योगिता या कवी विलास माळी यांच्या पत्नी होत्या. त्याच्या काव्यप्रेमापोटी महाराष्ट्रील कवींच्या काव्यसंग्रहास त्यांच्या स्मृतिदिनी २५ जुलै रोजी दिले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधित प्रकाशित काव्यसंग्रहाच्या दोन प्रति कवी, प्रकाशकांनी पाठवाव्यात. सोबत कवीचा अल्पपरिचय, छायाचित्र १५ जुलैपर्यंत पाठवावे.

उत्कृष्ठ काव्यसंग्रहास प्रथम पुरस्कार ५००० रुपये, व्दितीय ३००० रुपये, तर तृतीय २००० रुपये रोख रक्कम, आकर्षक मानचिन्ह शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र सन्मानपूर्वक दिले जाणार आहे.

काव्यसंग्रह पाठविण्याचा पत्ता : श्री विलास माळी, ‘अनुबंध ‘ निवास पाटील कॉलनी . (यमगेकर कॉलनी शेजारी ) संकेश्वर रोड, मु . पो . ता . गडहिंग्लज, जि कोल्हापूर . पिन कोड : 416502
अधिक माहितीसाठी संपर्क – 9422033840


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading