April 20, 2024
Expensive Mango Japans Miyazaki article by vilas patne
Home » जगातील सर्वात महागडा आंबा – जपानचा मियाझाकी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जगातील सर्वात महागडा आंबा – जपानचा मियाझाकी

मध्य प्रदेशमधील जबलपूरच्या एका शेतकऱ्याने चोरी होवू नये म्हणून दोन आंब्याच्या झाडांच्या संरक्षणासाठी पहारेकरी आणि नऊ जर्मन शेफर्ड कुत्र्यांची व्यवस्था केली आहे. इतकी सुरक्षा पुरवण्यामागे खास कारण म्हणजे महागडया आंब्याचे मियाझाकी झाड.

अॅड. विलास पाटणे

रत्नागिरी

मियाझाकी हे नाव जपान मधील शहरावरून पडले आहे . जपानमध्ये या आंब्याला Eggs Of The Sun ( Taiyo -no -Tamgo -in Japanese ) म्हणतात . जपानमध्ये ओकीनावा या फळानतंर मियाझाकीचा नंबर लागतो. उबदार हवामान, अधिक सुर्यप्रकाश व भरपूर पाऊस मियाझाकीला पोषक आहे. जपानमध्ये कुयुशु प्रदेशांत मियाझाकीच्या उत्पादनाला 1970 – 80 मध्ये सुरवात झाली. एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान या आंब्याचे उत्पादन घेतले जाते. दोन आंब्याच्या पेटीला 8600 ते दोन लाख सत्तर हजार किमंत येते. अत्यंत कठोर तपासणी नतंर दर्जा संबधी तडजोड न करता मियाझाकी निर्यात केला जातो.

मध्य प्रदेशमधील जबलपूरच्या एका शेतकऱ्याने चोरी होवू नये म्हणून दोन आंब्याच्या झाडांच्या संरक्षणासाठी पहारेकरी आणि नऊ जर्मन शेफर्ड कुत्र्यांची व्यवस्था केली आहे. इतकी सुरक्षा पुरवण्यामागे खास कारण म्हणजे महागडया आंब्याचे मियाझाकी झाड. या सिझनला एका आंब्याला तब्बल 21,000 ला मागणी होती.

संकल्प परिहार यांनी आपल्या बागेत एका वर्षांपूर्वी दोन आंब्याची रोपे लावल्यानतंर या झाडाला लाल रंगाचा आंबा आल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यांना हा मियाझाकी आंबा असल्याचे कळले. त्यानी आपल्या आईचे नाव दामिनी त्या आंब्याला दिले. हा आंबा भारतात क्वचितच पिकवला जातो आणि त्याला सूर्याची अंडी म्हणूनही ओळखले जाते. या आंब्याचे वजन ३५० ग्रॅम इतके असते आणि त्यात साखराचे प्रमाण नेहमीपेक्षा १५ टक्क्यांपेक्षा जास्त असते.

मियाझाकी हा एक प्रकारचा “इरविन” आंबा आहे. जो दक्षिणपूर्व आशियात मोठ्या प्रमाणात पिकवण्यात येणाऱ्या आंब्यापेक्षा वेगळा आहे, असे जपानी व्यापार तज्ञाचे म्हणणे आहे. हे आंबे अँटिऑक्सिडंटमध्ये समृद्ध असतात तसेच त्यात बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अ‍ॅसिड असते, जे डोळ्यांसाठी उत्तम आहे. तसेच कॅन्सरवर गुणकारी असून कोलेस्ट्राल नियंत्रणात राहाते व कांती सतेज राहाते असे रेड प्रमोशन सेंटरने सांगितले. दृष्टीदोष कमी होण्यास मदत होते

मियाझाकी आंबे बर्‍याचदा लाल रंगाचे असतात आणि त्यांचा आकार डायनासोरच्या अंड्यांसारखा दिसतो. मियाझाकी आंब्यापासून पुडिंग, कॅरामल, ज्यूस व वाईन बनविली जाते. कोकणातील आंबा उत्पादकानी संशोधन करून मियाझाकीचा प्रयोग करायला काय हरकत आहे ?

Related posts

मराठी पत्रकारितेतील विद्वतेच्या परंपरेची मुहुर्तमेढ रोवणारे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

निवडणुकांसाठीच कृषी कायदे रद्दचा निर्णय ? आपणास काय वाटते…

कृषि रसायनाबाबत शेतकऱ्यांना साक्षर करणारे पुस्तक

Leave a Comment