December 10, 2022
Ramchandrapant Amatya Wada Gaganbawada article by Geeta Khule
Home » Photos And Videos : गगनबावडा अन् बावडेकर वाडा…
पर्यटन फोटो फिचर

Photos And Videos : गगनबावडा अन् बावडेकर वाडा…

गिता खुळे,

दुर्गवारी, डी सुभाष प्रोडक्शन

http://instagram.com/durg_kanya

रामचंद्र पंत अमात्य यांचा गगनबावडा येथील बावडेकर वाड्याचा परिचय छायाचित्रे अन् व्हिडिओतून

रामचंद्र पंत अमात्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुत्सद्दी व राजनीतीचे अफाट ज्ञान असलेले थोर व्यक्तिमत्व. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबरच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, रणरागिणी ताराराणी यांनाही रामचंद्र पंतांची मोलाची साथ लाभली. मराठ्यांच्या अनेक राजवटीचा उत्कर्ष पाहणाऱ्या रामचंद्र पंतांना राजाराम महाराजांनी “हुकूमत पन्हा” हा किताब दिला. त्याच बरोबर गगनगड व गगनबावड्याची जहागिरी त्यांना सुपूर्द केली.

कोल्हापूरपासुन ४६ किलोमीटरवर गगनबावडा मार्गावर पळसंबे येथील पंतांचा वाडा “बावडेकरांचा वाडा” म्हणुन प्रसिद्ध आहे. प्रवेशद्वारापासूनच घनदाट झाडांच्या सावलीत उभा असलेला अतिशय भव्य दुमजली वाडा दिसतो. त्याच्या भिंती, खांब, तुळ्या आणि पन्हाळी कौलासह तो भक्कम उभा असून मुख्यद्वारावर वीरगळ, जुने अवशेष आणि दोन तोफा आपलं स्वागत करतात.

वाड्याच्या आत मात्र कुठल्याही प्रकारे चित्रण करण्याची परवानगी नाही. पण, वाड्यात भारावून टाकणाऱ्या अनेक गोष्टी असुन त्यात जुन्या काळातील भांडी, ठासणीच्या बंदुका, तलवारी, दांडपट्टे आणि विशेष म्हणजे पाच पिढ्यांचा सुंदर पाळणा ही आहे. याचबरोबर वाड्यात जिरेटोप आणि विविध संस्थानांच्या पद सांभाळणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या पगड्यांची प्रतिकृती, जतन करून ठेवलेले अनेक ऐतिहासिक दस्तऐवज पाहायला मिळतात. शिवाय वाड्याची आतील रचना, दिवाणखाना, बैठक व्यवस्था, खुर्च्या, झुंबर आणि इतर संग्रहित करून ठेवलेला खजिना डोळे दिपवणारा आहे.

या वाड्याचे त्यांच्या वंशजांनी चांगल्या प्रकारे जतन केले असून, अनेक नामवंत कलाकारांचा सहभाग असलेले अनेक चित्रपट व मालिकांचे इथे चित्रण झाले आहे. “पछाडलेला” हा मराठी सुप्रसिध्द चित्रपट इथेच चित्रित करण्यात आला. कर्तृत्व, ज्ञान, गतकालीन वैभव आणि अनेक पिढ्यांचा स्वाभिमान असलेला हा वारसा आजही मानाने उभा आहे

बावडेकर वाडा, गगनबावडा याचा व्हीडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

Related posts

चक्क बर्फाच्या हॉटेलमध्येच मुक्काम ! (व्हिडिओ)

Navratri Biodiversity Theme : जैवविविधतेची मोरपंखी छटा…

कृषी पर्यटनात पर्यटकांना असे करा आकर्षित…

Leave a Comment