November 21, 2024
An Engaging slice of life inspiritng story book by Dr Aparna Patil
Home » प्रेरणादायी कथांचे पुस्तक – एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ
काय चाललयं अवतीभवती

प्रेरणादायी कथांचे पुस्तक – एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ

डॉ अपर्णा पाटील यांच्या एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ या पुस्तकाचे प्रकाशन नाबार्डचे माजी चेअरमन डॉ यशवंत थोरात यांच्या हस्ते होत आहे. त्या निमित्ताने पुस्तकाचा परिचय…

जीवनात अनेक प्रसंग आपणाला खूप काही शिकवून जातात. असेच काहीसे प्रसंग लेखिका डॉ. अपर्णा पाटील यांनी या पुस्तकात कथेच्या स्वरुपात मांडले आहेत. प्रेरणा देणाऱ्या अशा विविध बारा गोष्टींचे हे पुस्तक आहे.

एक कथा एका भित्र्या आणि लाजाळू मुलीची आहे. घरातील आर्थिक परिस्थितीमुळे ती दबलेली असते. सतत ती कोणत्या ना कोणत्या तरी दडपणा खाली असते. पण तिच्या मनात इंग्रजी बोलायला शिकण्याची इच्छा असते. याबाबत तिला शाळेमध्ये फारसे मार्गदर्शन मिळत नाही. पण तिची ही सुप्त इच्छा तिच्याच गावात असणाऱ्या वाचनालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेमुळे पूर्ण होते. वाचनालयाने इंग्रजी बोलण्याचा दहा दिवसांचा अभ्यासक्रम शिकवण्याचा उपक्रम घेतलेला असतो. त्यामध्ये ही मुलगी भित भितच सहभागी होते. सतत दडपणाखाली आणि भीतीमुळे तिला फारसे काही इंग्रजी बोलता येत नसल्याचा सर्वांचा ग्रह झालेला असतो. पण अभ्यासक्रमाच्या अखेरच्यादिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये चक्क ही मुलगी मला बोलायचे आहे म्हणून पुढे येते. धाडसाने ही मुलगी स्पष्ट उच्चारात इंग्रजीत एक विनोद सांगते. तेव्हा सर्वांनाच तिचे कुतूहल वाटते. कारण ती अभ्यासक्रमाच्या कालावधीत एकदाही निटसे बोलता आलेले नसते. पण ती त्यातून शिकत होती. झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत होती. अशी ही धाडसाची प्रेरणादायी कथा आहे. चुका सुधारत शिकण्याची कला जिद्दीने आत्मसात करता येई शकते हे सांगणारी ही कथा आहे.

स्वप्नाबद्दल एक कथा आहे. लेखिकेला स्वप्न पडत असतात. लेखिकेला वाटते या स्वप्नांचा संबंध तिच्या जीवनाशी आहे. पण नंतर तिच्या लक्षात येते की असे काही नाही. स्वप्न हे स्वप्नच असते. त्याचा जीवनाशी काही संबंध नाही. वास्तवाचे भान आपण ठेवायले हवे. ते स्विकारायला हवे. वास्तवाशी सामोरे जाऊन जीवन जगता यायला हवे. अशी ही वेगळी वास्तवी जीवन जगण्याचा संदेश देणारी कथा आहे.

लेखिकेने तिच्या जीवनात आलेले काही प्रसंग कथेतून मांडले आहेत. व्यासपीठावर बोलण्याचा तिचा पहिला अनुभव तिने एका कथेत मांडला आहे. तिचे व्यासपीठावर बोलण्याचे धाडसच होत नाही. त्यात ती अपयशी ठरते. पण कार्यक्रमाचे संयोजक तिला धीर देतात आणि तिला पुन्हा बोलण्याची संधी देतात. ही संधी तिच्यासाठी फार मोलाची ठरते. ती उत्तमरित्या बोलते. तिला जर बोलण्याची दुसरी संधी मिळाली नसती तर कायमची खचून गेली असती. तिच्यामनामध्ये कायमच ती सल राहीली असती. संयोजकांनी दिलेली एक संधी किती मोलाची ठरली असे सांगणारी ही कथा आहे. जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा प्रेरणादायी ठरू शकतात. आपले जीवन सुखमय करू शकतात. असे सांगणारे प्रसंग लेखिकेने या पुस्तकात मांडले आहेत. दहावी-बारावीच्या परिक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर कसा ताण निर्माण होतो. त्यातून काय घडू शकते. नकारात्मक परिणाम अशा मुलांवर कसे येऊ शकतात. या संदर्भातील एक समस्या मांडणारी कथा आहे. निश्चितच या कथेतून काहीतरी बोध घ्यायला हवा असा प्रयत्न लेखिकेने या पुस्तकातून केला आहे.

लेखिका काही कारणास्तव सतत दुःखी असते. तिच्या आयुष्यात ती खचत चाललेली असती. या बिकट परिस्थितीतून मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न तिची आई करत असते. एकदा त्या मुलीची आई तिला रेल्वेतून बाहेर फिरायला नेते. या प्रवासात त्यांना एक अपंग मुलगी दिसते. तिला साधे उभेही राहाता येत नसते. अशा अवस्थेतच ती अपंग मुलगी सर्वांचे मनोरंजन करते आणि हसायला भाग पाडते. स्वतःचे दुःख विसरून ही अपंग मुलगी दुसऱ्यांना सुख देते हे लेखिकेला खूपच भावते. या अपंग मुलीपासून लेखिका प्रेरणा घेते. या अपंग मुलीपेक्षा आपले दुःख कितीतरी कमी आहे. ही अपंग मुलगी इतक्या बिकट परिस्थितीत सर्वांना हसवते मग आपण का इतके दुःखी राहायचे असे तिला वाटते. यातून ती प्रेरणा घेते व स्वतःचे जीवन सुखी करते. अशी ही प्रेरणादायी कथा आहे.

लेखिकेला स्वतःला डॉक्टर व्हायचे होते. पण तिच्या आजारपणामुळे तिला सायन्सला प्रवेश घेता येत नाही. डॉक्टर होण्याची इच्छा तिची अपूर्ण राहीली असे तिला वाटते असते. पण ती स्वतः जिद्द सोडत नाही. आपण निवडलेल्या वेगळ्या विषयात प्राविण्य मिळवायचे असे ती ठरवते व ती त्या विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळवते. अशा प्रेरणादायी कथांचा समावेश या पुस्तकात आहे. हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे. पण सोप्या भाषेत असल्याने नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.

पुस्तकाचे नाव – एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ
लेखिका – डॉ. अपर्णा पाटील
प्रकाशक – इन किंग इनोव्हेशन, मुंबई
किंमत – २८० रुपये
पुस्तकांसाठी संपर्क – 9890618393


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading