सोलापूर – शेळवे ( ता. पंढरपूर ) येथील बळीराजा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य व साहित्यिकांना आणि त्यांच्या लेखणीला प्रेरणा देण्यासाठी विविध पुरस्कार देण्यात येतात.
यंदा कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य आणि ललित ( आत्मकथन, चरित्र, ललित ) या साहित्यकृतींपैकी उत्कृष्ट ५ साहित्यकृतींना राज्यस्तरीय रानशिवार साहित्य पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. तरी साहित्यिकांनी २०२३ तसेच २०२४ या दोन वर्षात प्रकाशित झालेले साहित्य पुरस्कारासाठी दोन प्रतीत पाठवावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गाजरे यांनी केले आहे.
प्रस्ताव पाठवताना सोबत २ साहित्यकृती अल्प परिचय पाठवावा. कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य आणि ( आत्मकथन, चरित्र आणि ललित यापैकी एक) साहित्यकृती पाठविण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२५ अशी आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे.
पुस्तके पाठविण्याच पत्ता –
प्रकाश ज्ञानोबा गाजरे, अध्यक्ष, बळीराजा प्रतिष्ठान
बळीराजा कृषी सेवा केंद्र, शेळवे
ता. पंढरपूर, जि. सोलापूर 413304
अधिक माहितीसाठी संपर्क – 9766643066, 9763326655
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.