December 28, 2025
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 64.66% मतदानाची नोंद झाली. राज्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान शांततेत पार पडले. निवडणूक आयोगाने संपूर्ण वेबकास्टिंग केली.
Home » बिहार निवडणूकीत पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक 64.66% मतदान
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

बिहार निवडणूकीत पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक 64.66% मतदान

बिहार निवडणूक 2025 टप्पा-1: ऐतिहासिक 64.66% मतदान

नवी दिल्‍ली – बिहार निवडणूक 2025 साठी गुरूवारी मतदान झाले. यातील ठळक घडामोडी…

  1. बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज उत्सवी वातावरणात शांततेत पार पडला. बिहारच्या इतिहासात आतापर्यंतचे सर्वाधिक 64.66% मतदान झाले.
  2. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह थेट वेबकास्टिंगद्वारे मतदानावर बारकाईने लक्ष ठेवले, बिहारमध्ये हे पहिल्यांदाच 100% मतदान केंद्रांवर सुनिश्चित करण्यात आले.
  3. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या नियंत्रण कक्षातून डीईओ यांच्याशी संवाद साधला.
  4. राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान झाले, एकूण मतदारांची संख्या 3.75 कोटींहून अधिक आहे.
  5. बिहारमध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम (आईव्हीपी) अंतर्गत, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, फिलीपिन्स, बेल्जियम आणि कोलंबिया या 6 देशांतील 16 प्रतिनिधींनी मतदान प्रक्रिया पाहिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर, सुव्यवस्थित, पारदर्शक, कार्यक्षम आणि सहभागी निवडणुकांपैकी एक म्हणून बिहार निवडणूकीचे प्रतिनिधींनी कौतुक केले.
  1. अनेक नवीन मतदार-अनुकूल उपक्रमांचा भाग म्हणून, ईव्हीएम मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो पाहून मतदार खूप आनंदी झाले. इतर नवीन उपक्रमांमध्ये मतदान केंद्रांवर मोबाईल डिपॉझिट सुविधा, सहज वाचता येणारी नवीन डिझाइन केलेली मतदार माहिती स्लिप (व्हीआयएस) आणि गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर 1,200 पर्यंत मतदार यांचा  समावेश होता.
  2. सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअर आणि दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक निर्दिष्ट करण्यात आले. दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी ई-रिक्षा सुविधा देखील प्रदान करण्यात आली होती.
  3. जिल्हानिहाय आणि विधानसभा मतदार संघ  निहाय अंदाजे मतदानाचे आकडे ईसीआयनेट अॅपवर उपलब्ध आहेत.

Poll Participation (%age) before Bihar Election 2025

General Election to Lok Sabha (1951 – 2024) General Election to Legislative Assembly of Bihar (1951 – 2020)
YearPoll Participation (%)YearPoll Participation (%)
1951-5240.35 (Lowest)1951-5242.6 (Lowest)
195740.65195743.24
196246.97196244.47
196751.53196751.51
197148.96196952.79
197760.76197252.79
198051.87197750.51
198458.8198057.28
198960.24198556.27
199160.35199062.04
199659.45199561.79
199864.6 (Highest)200062.57 (Highest)
199961.482005-Feb46.5
200458.022005-Oct45.85
200944.47201052.73
201456.26201556.91
201957.33202057.29
202456.28 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सोहळा लोकशाहीचा , जागर मताधिकाराचा

लोकांनी कमावलं, आयोगाने घालवलं..!

AIKS strongly condemns the promotion of communal hatred by the Communal Fascist BJP-Sangh Parivar

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading