फ्लोरा ऑफ सागरेश्वर वाईल्ड लाईफ सॅन्च्युरी या पुस्तकात अभयारण्यात आढळणाऱ्या विविध वनस्पतींची माहिती देण्यात आली आहे. यामुळे हे पुस्तक संशोधक, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी यासह सर्वांनाच मार्गदर्शक असे आहे.
सागरेश्वर अभयारण्याचे संवर्धन आणि विकास लोकसहभागातून केला जात आहे. महाराष्ट्रातील एकमेव कृत्रिम अभयारण्य आहे. ज्यामध्ये ३४० सांबर, ३१० चित्ते आणि १२७ काळविट आढळतात. या व्यतिरिक्त विविध प्रकारचे सुमारे हजारावर प्राणी पाहायला मिळतात. सुमारे १०८७ हेक्टरचे हे अभयारण्य आहे. सुरुवातीला या क्षेत्रावर विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली. तसेच भूसंवर्धनाची कामे करण्यात आली. सुरुवातीला येथे प्राण्यांसाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. तसेच त्यांना अन्नही पुरवले जात होते. मात्र आता हे अभयारण्य नैसर्गिक अभयारण्यात रुपांतरीत झाले आहे. प्राण्यांना लागणारे अन्न आणि पाणी याची व्यवस्था या अभयारण्यात झाली आहे.
अभयारण्याजवळ असणाऱ्या भगवान शंकराच्या मंदिरावरून या अभयारण्यास सागरेश्वर हे नाव पडले. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली होती. परिसर उजाड झाला होता. पण डी. एम. मोहिते आणि राज्य वन विभागाने परिश्रम घेत हा भाग पुन्हा विकसित झाला. उजाड पडलेली जमिनी राखीव वनामध्ये त्यांनी आणली. पुढे माजी उपप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या सहकार्याने ही जागा वन्यजीव अभयारण्यात समाविष्ट करण्यात आली. १९८५ मध्ये राखीव वनास सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.
फ्लोरा ऑफ सागरेश्वर वाईल्ड लाईफ सॅन्च्युरी या पुस्तकात अभयारण्यात आढळणाऱ्या विविध वनस्पतींची माहिती देण्यात आली आहे. यामुळे हे पुस्तक संशोधक, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी यासह सर्वांनाच मार्गदर्शक असे आहे.
सांगली जिल्ह्यातील पलुस, कडेगाव, खानापूर, वाळवा तालुक्यांच्या सीमाभागात हे अभयारण्य वसलेले आहे. पण या अभयारण्याच्या क्षेत्रात मानवी वस्ती नाही. भगवान लिंगेश्वर आणि भगवान काळभैरव ही मंदिर अभयारण्याच्या क्षेत्रात मोडतात. यामुळे अनेक भाविक देवदर्शनाच्या निमित्त्याने या अभयारण्यात येत राहतात. श्रावणामध्ये चारही सोमवार येथे उत्सव भरतो. यानिमित्ताने हजारो पर्यटक या अभयारण्यास भेट देतात. अशा या अभयारण्याची ओळख फ्लोरा ऑफ सागरेश्वर वाईल्ड लाईफ सॅच्युरी यामध्ये करून देण्यात आली आहे.
भारतात सुमारे २००० वर औषधी वनस्पती आढळतात. त्यातील ४४३ वनस्पती या महाराष्ट्रात आढळता. या अभयारण्यात Asparagus racemosus, Abrus precatorius, Ecliptra prostrata, Clerodendrum serratum, Oxalis coarniculata, Polyalthia longifolia, Portulaca oleracea, Urena lobata, vitex negundo, Xanthium indicum, Oxalis coarniculata, Hisbiscus rosa, Heliotropium indicum, Celosia argentea, Cassia fistula, Cassia tora, Buchanania Cochinchinenis आदी औषधी वनस्पती आढळतात. सुमारे १४ स्थानिक वनस्पती येथे आढळतात. त्याची नोंद या पुस्तकात करण्यात आली आहे. Blumea malcolmii, Boswellia serrata, Crotolaria filiper, Cucumis setosus, Cyanotis faasisculata, Glabrescens, Hardwikia binata, Dichrostachys cinearea, Iphigenia magnifica, Iphigenia stellata, Kalanchoe bhidei, Neuracanthus sphaerostachyus, Pimpinella tomentosa and Tricholpis radicans अशा या वनस्पती आहेत.
पुस्तकाचे नाव – फ्लोरा ऑफ सागरेश्वर वाईल्ड लाईफ सॅच्युरी
लेखक – डॉ मधुकर बाचुळकर-चोळेकर, विकास आवळे
प्रकाशक – निसर्ग मित्र प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे – १०४, किंमत – १२० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.