मुंबई: येथील वंदना प्रकाशन संस्थेतर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी पुरस्कार देण्यात येतात. सन १९९७ पासून दरवर्षी आशीर्वाद पुरस्कार दिले जात आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्व साहित्य प्रकारांना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येते. यासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन डॉ. सुनील सावंत यांनी केले आहे.
१ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०२३ या १३ वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती इच्छुक सहभागी लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, प्रकाशक, वितरक व संबंधितांनी स्वतःच्या अतिअल्प परिचयासह संस्थेकडे पाठवाव्यात. ३० मे २०२४ पर्यंत या साहित्यकृती मुंबईतील पत्त्यावर पाठविण्यात याव्यात.
यंदा आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळा दिवाळी २०२४ पूर्वी किंवा नंतर मुंबईत साजरा होईल. त्यावेळी पुरस्कार विजेत्यांना स्वखर्चाने सदर सोहळ्यास उपस्थित राहावे लागेल, ह्याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता :
डॉ. सुनील सावंत, ज्येष्ठ साहित्यिक व संस्थापक, ‘आशीर्वाद पुरस्कार ‘,
फ्लॅट नं. ६०४, चंद्रदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित,
आर. के. वैद्य मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – ४०० ०२८.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८१९१८२३२९.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.