महाराष्ट्राची अप्सरा अर्थात अभिनेत्री माधुरी पवार हिने चक्क ब्रह्माराक्षसा या कन्नड चित्रपटात काम केले आहे. हे करत असताना तिला भाषेच्या संदर्भात कोणत्या अडचणी आल्या. यावर तिने कशी मात केली. वेगळ्या भाषेत काम करताना विशेषतः ती भाषा आपणास येत नसताना त्यामध्ये काम करणे किती अवघड असते पण माधुरीने ते कसे सोपे केले. भाषेमुळे झालेल्या गमतीजमती यावर तिच्याशी केलेली बातचित…( मुलाखत ऐकण्यासाठी ऑडिओवर क्लिक करा )
कन्नड चित्रपट कसा मिळाला ? भाषेचा प्रश्न निर्माण झाला का ? आपणास कन्नड येते का येत नसतानाही तुम्ही कसे काय काम केले ? यासाठी कोणती तयारी करावी लागली ? भाषेची अडचण वाटली का ?
माधुरी पवार – कन्नड भाषा मला येत नव्हती. पण हिंदी आणि इंग्रजीमध्ये त्यांच्याशी संवाद साधता आल्याने फारशी अडचण वाटली नाही. शुटींगच्यावेळी मात्र आपणाला कन्नड शिकायला हवं असं वाटलं. कारण खूप साऱ्या गोष्टी डोक्यावरून जात होत्या. पण प्रयत्न सोडले नाहीत. सेटवरील प्रत्येक व्यक्तीला मी शब्दाचे अर्थ विचार होते. यातून हिला कन्नड शिकायचे आहे असे वाटू लागल्याने प्रत्येकाने सहकार्य केले. भाषेचे आकलन होणे इतक्या पटकण होणे शक्य नव्हते पण गाण्याची प्रत्येक ओळ आणि शब्द याचा अर्थ आणि त्याचा भावनांशी संबंध यावर खूप काम करावे लागले. भाषेची अडचण आली पण सर्वांच्या सहकार्याने ती सोपीही झाली.
भाषा समजत नसल्याने गाण्यातील शब्दावरुन काही गमती-जमती झाल्या असतील या संदर्भात काही किस्से सांगू शकला का ?
माधुरी पवार – हो गमती-जमतीतर खूप झाल्या. काही टारगट मुले मला चुकीचे शब्द सांगत होते. पण दिग्दर्शकांनी मला शब्दाचा खरा अर्थ सांगितला तेव्हा खूपच गंमत झाली.
दक्षिणात्य चित्रपटात वापरले जाणारे तंत्रज्ञान खूपच आधुनिक आहे. तेथील तंत्रज्ञानामुळे काम करण्यात काही अडचणी वाटल्या का ? त्यांची काम करण्याची पद्धती कशी असते ?
माधुरी पवार – दक्षिणात्य चित्रपटात काही तांत्रिक अडचण आली तर ते शुटींग थांबवतात पण कलाकरांचा वेळ ते वाया जाणार नाही याची काळजी घेतात. असाच एक किस्सा सेटवर घडला पण ती तांत्रिक अडचण दुर होईपर्यंत माझ्याकडून त्यांनी अन्य काही गोष्टी करून घेतल्या यामुळे वेळ वाया गेला नाही. तेथील तंत्रज्ञान खूपच आधुनिक आहे यातून खूप काही शिकालायला मिळाले.
माधुरी पवार यांच्या काही अन्य अदाकारी…





Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.