प्रश्न – राज्यात थंडीची लाट व लाटसदृश्य स्थिती कोठे जाणवू लागली आहे ?
माणिकराव खुळे – संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक नगर उत्तर, जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात बुधवार दि. ५ मार्च पासून पहाटे ५ च्या किमान तापमानात एकाकी घसरण झाली असुन महाराष्ट्रातील काही ठिकाणी म्हणजे नगर जळगांव नाशिक ह्या शहर व जिल्हा परिसरात सकाळच्या वेळी थंडीची लाट व थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती जाणवू लागली आहे. किमान तापमानाचा पारा ह्या ठिकाणी १० डिग्री से. ग्रेडपर्यन्त घसरू लागला आहे. ही परिस्थिती बुधवार दि. ५ ते शनिवार दि. ८ मार्च असे चार दिवस राहण्याची शक्यता जाणवते.
मुंबईसह संपूर्ण कोकण व पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर अश्या जिल्ह्यात मात्र ही स्थिती नाही. तेथे पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतके किंवा काही ठिकाणी सरासरीपेक्षा काहीसे अधिक तर काही ठिकाणी किंचितसे कमी आहे.
प्रश्न – दिवसाच्या कमाल तापमानाची स्थिती काय आहे?
माणिकराव खुळे – पहाटेच्या किमान तापमानाचे ठिक असले तरी, संपूर्ण विदर्भ व नगर, जळगांव, जेऊर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात दिवसाचे तापमान म्हणजे दुपारी ३ च्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते ३ डिग्रीने वाढ झालेली जाणवत आहे. मुंबईसह कोकणात तर ही वाढ ४ ते ५ डिग्रीपर्यंत झेपावली आहे. त्यामुळे तेथे दिवसाची उष्णतेची ताप चांगलीच जाणवत आहे.
प्रश्न – सध्य :परिस्थितीत महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे काय?
माणिकराव खुळे – मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्ण व दमट वातावरणातून जाणवत आलेला रात्रीचा उकाडा बुधवार दि. ५ ते शनिवार दि. ८ मार्च असे चार दिवस राहण्याची शक्यता जाणवते. तर रविवार-सोमवार दि. ८ व ९ मार्च ला उष्णतेच्या लाटेची शक्यताही नाकारता येत नाही.
प्रश्न – कश्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली ?
माणिकराव खुळे – काल बुधवार दि.५ मार्चपासून उत्तर भारतातून उत्तर दिशेने महाराष्ट्राकडे थंडी घेऊन येणारे वारे महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक व नगर उत्तर जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात धडकू लागल्यामुळे एकाकी ही थंडीत वाढ होतांना दिसत आहे. गेल्या दिड महिन्यापासून म्हणजे २५ जानेवारीपासून ते काल बुधवार पर्यन्त बंगालच्या उपसागरातून पूर्वीय दिशेचे दमट व आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या एकसूरी वहनातून उत्तर दिशेने महाराष्ट्रात थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव होत होता. तो अटकाव वारा वहन प्रणालीतील बदलातून जाणवत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.