आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२
.
थंडीचे दिवस –
आजपासुन नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर सह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा व खान्देश मधील २६ जिल्ह्यांत पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार दि. १५ नोव्हेंबर (लहान एकादशी, आळंदी यात्रे)पर्यंत सध्य:स्थितीत रात्री जाणवणारी थंडीसारखी थंडी जाणवेल, असे वाटते.
जळगांवात तीव्र थंडीची लाट-
जळगांवला आज पहाटे पाच वाजता ९.२ अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन सरासरीपेक्षा ६.७ इतक्या अंश से. ने ते खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची तीव्र लाट अनुभवली गेली. जळगांवचे दुपारी ३ चे कमाल तापमानही २९.७ अंश से. इतके नोंदवून सरासरीच्या ३.७ अंश से.ने हे तापमान खालावलेले आहे. त्यामुळे तेथे व लगतच्या परिसरात रात्री बरोबर दिवसाही हूड-हुडी जाणवली.
थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती –
महाराष्ट्रातील डहाणू, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जेऊर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड ह्या शहरांबरोबरच संपूर्ण विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात आज थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.
वातावरणीय बदल –
रविवार दि. १६ नोव्हेंबर पासुन जर वातावरणीय काही बदल झाल्यास त्यावेळी अवगत केला जाईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
