जागतिकीकरणामध्ये जग हे ग्लोबल खेड्यात रुपांतरित होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठदेखील झपाट्याने विकसित होताना दिसते. विकसित होणाऱ्या बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात नामांकित ब्रँडस् सहजपणे उपलब्ध होत आहेत. त्यातच ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय ग्राहकांकडे आल्याने नामांकित ब्रँडस् एका क्लिकसरशी ग्राहकांना घरपोच मिळू लागला आहेत. बाजारातल्या या वाढत्या स्पर्धेमुळे आज ग्राहक हा खऱ्या अर्थाने ग्राहक राजा बनला आहे.
टी आर पांडे, ग्राहक मार्गदर्शन संस्था तज्ज्ञ
श्री संपतराव माने महाविद्यालयांमध्ये ‘ग्राहकांचे अधिकार आणि वित्तीय साक्षरता’ एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा
खानापुर – श्री संपतराव माने महाविद्यालयांमध्ये ग्राहक मार्गदर्शन संस्था मुंबई अर्थशास्त्र विभाग, एन एस एस व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यावतीने ‘ग्राहकांचे अधिकार आणि वित्तीय साक्षरता ‘ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष राजकुमारदादा माने, संस्थेचे सचिव अॅड विराजभैया माने तसेच प्राचार्य डॉ जे. जी मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. तसेच प्रमुख पाहुणे टी आर पांडे व अमेय वझे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ जे जी मुलाणी हे होते.
या कार्यशाळेची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार स्वर्गीय संपतराव माने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
आयुष्यामध्ये पैशाला अनन्य साधारण महत्त्व आहे . त्यासाठी प्रत्येक युवक – युवतीने आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे. स्वतः जवळील पैसा भविष्यकाळासाठी कसा फायद्याचा ठरेल याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पैसा बचत बरोबर योग्य गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला पैसा गुंतवून आपले व कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण ही आपली जबाबदारी आहे हाच आत्मनिर्भर भारताचा पाया आहे.
अमेय वझे, सेबीचे स्मार्ट गुतंवणूक
दुसऱ्या सत्रात ग्राहक मार्गदर्शन संस्था तज्ज्ञ टी आर पांडे यांनी जागतिकीकरणामध्ये जग हे ग्लोबल खेड्यात रुपांतरित होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठदेखील झपाट्याने विकसित होताना दिसते. विकसित होणाऱ्या बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात नामांकित ब्रँडस् सहजपणे उपलब्ध होत आहेत. त्यातच ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय ग्राहकांकडे आल्याने नामांकित ब्रँडस् एका क्लिकसरशी ग्राहकांना घरपोच मिळू लागला आहेत. बाजारातल्या या वाढत्या स्पर्धेमुळे आज ग्राहक हा खऱ्या अर्थाने ग्राहक राजा बनला आहे. परंतू फसवेगिरी देखील प्रचंड वाढली आहे. स्पर्धेतून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच हा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. यासाठी ग्राहककेंद्रीत बाजारव्यवस्था विकसित निर्माण होणे ही काळाची गरज आहे. त्यातुनच उद्याच्या विकसित भारताचे ध्येय साकार होणार आहे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ जे जी मुलाणी यांनी आयुष्य जगताना आपला भविष्य काळ चांगला व सुखाचा जावा, यासाठी पैशाचा विनियोग सुयोग्य करावा. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ घालुन जीवनापासुनच आपण अर्थसाक्षर राहिले पाहीजे. तसेच ग्राहक म्हणुन देखील आपण तितकेच दक्ष राहिले पाहिजे., असे मत मांडले.
प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ नितिन बाबर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डि. के. गोडसे यांनी तर आभार प्रा. सचिन जाधव यांनी मांडले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
