टास्क फोर्स सारख्या उपाययोजना जर प्रभावीपणे राबवल्या, तर या अपवादात्मक घटनांवर नियंत्रण येईल, गैरसमज दूर होतील आणि रुग्णांना विनाकारण खर्च न करता योग्य व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळू लागेल. या डॉक्टर्स डे च्या निमित्ताने आपण सर्व डॉक्टर बांधवांचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार मानूया
पी. जी. मेढे, मोबाईल – ९८२२३२९८९८
केाल्हापूर
डॉक्टर्स डे : मानवतेच्या सेवेतील देवदूतांना वंदन
१ जुलै — डॉक्टर्स डे म्हणून देशभरात साजरा केला जातो. या दिवशी आपण मानवतेच्या सेवेचे व्रत हसत हसत पार पाडणाऱ्या डॉक्टर समुदायाचे ऋणमान्य करतो. स्वतःच्या आरामाची, कुटुंबाची, वैयक्तिक आयुष्याची पर्वा न करता रुग्णांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या या वैद्यकीय देवदूतांना मानाचा मुजरा करण्याचा हा दिवस.
आजच्या युगात वैद्यकीय विज्ञानात झालेल्या अभूतपूर्व प्रगतीमुळे निदान, उपचार, शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन या सर्वच क्षेत्रांत डॉक्टरांचा सहभाग मोठा आणि महत्त्वपूर्ण झाला आहे. भारतीय नागरिकांचे सरासरी आयुर्मान आता ७० वर्षांहून अधिक झाले आहे, हे या विशेषज्ञ डॉक्टरांच्या कौशल्य आणि समर्पणाचे मूर्त रूप आहे. ही सामाजिक झेप वैद्यकीय क्षेत्राने घडवलेली एक महत्त्वाची क्रांतीच आहे.
याच अनुषंगाने आज कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने घेतलेला निर्णय फारच अभिनंदनीय आहे. “वैद्यकीय टास्क फोर्स” ची स्थापना. ही टास्क फोर्स डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद अधिक सुस्पष्ट, विश्वासार्ह आणि संवेदनशील बनवेल. रुग्णांच्या तक्रारींचे निवारण, मार्गदर्शन, आणि वैद्यकीय सल्ल्यात पारदर्शकता यासाठी ही एक अभिनव पायरी ठरेल.
पण हेही मान्य करावे लागेल की, काही अपवादात्मक घटनांमुळे काही रुग्णांना अपुरी माहिती, वेळेवर सल्ला न मिळणे, किंवा “रिंग सिस्टीम” च्या माध्यमातून अनावश्यक संदर्भ मिळवण्याचे प्रकार अनुभवास येतात — जे एका शिक्षित, नीतिमान आणि आदर्शव्यवहारी डॉक्टर समुदायाकडून अपेक्षित नाहीत. पैसा हा गरजेचा असतोच, पण मानवतेपेक्षा तो मोठा कधीही ठरता कामा नये. हिप्पोक्रेटिक शपथ ही फक्त समारंभापुरती न राहता ती सेवाभावाचे व्रत बनली पाहिजे.
टास्क फोर्स सारख्या उपाययोजना जर प्रभावीपणे राबवल्या, तर या अपवादात्मक घटनांवर नियंत्रण येईल, गैरसमज दूर होतील आणि रुग्णांना विनाकारण खर्च न करता योग्य व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळू लागेल. या डॉक्टर्स डे च्या निमित्ताने आपण सर्व डॉक्टर बांधवांचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार मानूया — सर्वसामान्य डॉक्टर, सर्जन्स, तज्ज्ञ, आणि आरोग्य यंत्रणेतील फ्रंटलाइन वर्कर्स — सर्वांचे! त्यांच्यामुळे हे समाजाचे आरोग्य सुरळीत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.