November 14, 2024
During the Kartik Purnima there will be some cloudy weather and a break in the cold for three days
Home » कार्तिक पौर्णिमेदरम्यान तीन दिवस काहीसे ढगाळ वातावरण व थंडीला विराम
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कार्तिक पौर्णिमेदरम्यान तीन दिवस काहीसे ढगाळ वातावरण व थंडीला विराम

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

‘ कार्तिक पौर्णिमेदरम्यान तीन दिवस काहीसे ढगाळ वातावरण व थंडीला विराम ‘

विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दि.१४ ते १७ नोव्हेंबर ला ( गुरुवार- शनिवारी) तीन दिवस ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर नगण्य अश्या किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते. ह्या निरभ्र आकाशामुळे सध्या सकाळ-संध्याकाळी  काहीश्या वाढत्या थंडीला,  फक्त ह्या तीन दिवसासाठी विराम मिळेल, असे वाटते.

जाणवणारा हा वातावरणीय परिणाम विशेषकरून रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर ह्या जिल्ह्यातच अधिक जाणवेल.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक ह्या जिल्ह्यात हा परिणाम जाणवणार नाही.
           रविवार दि. १७ नोव्हेंबरपासून पुन्हा थंडीसाठी स्थिती पूर्ववत होईल, असे वाटते.

पुढील आठवडाभर महाराष्ट्रात दुपारचे कमाल व पहाटेचे किमान असे दोन्हीही तापमाने हे सरासरीइतके राहून कमाल तापमान हे ३१ तर किमान तापमान हे १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.

पुढील आठवडाभर म्हणजे २० नोव्हेंबरपर्यन्त चक्रीवादळसाठीची कोणत्याही वातावरणीय प्रक्रियेची शक्यता नाही.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading