July 27, 2024
Folk poet Vitthal Wagh Kavya Award announced to poet Lalit Adhane
Home » लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार कवी ललित अधाने यांना जाहीर
काय चाललयं अवतीभवती

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार कवी ललित अधाने यांना जाहीर

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार कवी ललित अधाने यांना जाहीर

महाराष्ट्रातील नामवंत कवी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप तसेच इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रसिद्ध व्याख्याते प्रा. जावेद शेख यांच्या वतीने दरवर्षी लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार त्या वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट काव्यसंग्रहाला दिला जातो. 2023 या वर्षातील लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार कवी ललित अधाने यांच्या माही गोधडी छप्पन भोकी या काव्यसंग्रहाला निवड समितीचे अध्यक्ष कवी लक्ष्मण महाडिक यांनी जाहीर केला. निवड समितीत जयश्री वाघ, ज्ञानेश उगले, सागर जाधव या मान्यवर साहित्यिकांनी सदस्य म्हणून काम बघितले.

शेतकरी ,कष्टकरी, गावखेडे याचे समकालीन वास्तव मांडताना केवळ रडण्याची कविता न लिहिता लढण्याची कविता ललित अधाने यांच्या माही गोधडी छप्पन भोकी या कवितासंग्रहात दिसते. भूमी आणि भूमिका घेऊन ललित अधाने हा कवी कविता लिहितो.

दलित साहित्याप्रमाणे टोकाचा विद्रोह ग्रामीण कवितेत अभावाने दिसतो. तो ललितच्या कवितेत सापडला आहे. ही कविता जळजळीत वास्तव मांडते. या व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालते म्हणून ही कविता वेगळी ठरते. यामुळे आम्ही यावर्षी या संग्रहाची निवड सर्वानुमते पुरस्कारासाठी केली आहे. असे प्रतिपादन निवड समितीचे अध्यक्ष कवी लक्ष्मण महाडिक यांनी पुरस्कार जाहीर करताना केले.

अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे स्वरूप असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण 26 मे रोजी निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील मॅग्नस द्राक्ष एक्सपोर्ट कंपनीच्या आवारात सायंकाळी चार वाजता मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती या पुरस्काराचे संयोजक संदीप जगताप व जावेद शेख यांनी दिली.

महाराष्ट्रात अतिशय सन्मानाचा समजला जाणारा लोककवी विठ्ठल वाघ साहित्य पुरस्कार ललित अधाने या कवीला मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

काव्यप्रदेशातील स्त्री मराठी समीक्षेच्या प्रांतातील दखलपात्र समीक्षा लेखन

विरक्ती म्हणजे काय ?

१९ मार्च रोजी शेतकरी का करतात उपवास ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading