
४ मार्च १२२६ नंतर म्हणजेच तब्बल ८०० वर्षानंतर २१ डिसेंबर २०२० रोजी गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती आकाशा मध्ये सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे रात्री ९ वाजून १५ मिनिटापर्यंत पाहता येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयामध्ये पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर यांनी दिली.
श्री. कारंजकर म्हणाले, या दिवशी सूर्य हा आयनिक वृत्तावरून फिरताना जास्तीत जास्त दक्षिणेकडे सरकतो .उत्तर गोलार्धात या दिवशी सर्वात मोठी रात्र तर दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो आणि २१ किंवा २२ डिसेंबर ला सूर्याचे उत्तरायण चालू होते.अशा दोनी गोष्टींचा समस्त खगोल प्रेमीसह नागरिकांना आनंद घेता येणार आहे.
कोल्हापुरातील संस्कृती, ताज्या घडामोडी आदी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा कोल्हापूर प्रतिबिंब फेसबुक पेजवर
https://www.facebook.com/groups/KolhapurCulture/
श्री. कारंजकर म्हणाले, आपल्या सूर्य मालेतील पाचवा व सगळ्यत मोठा ग्रह गुरु आणि सहावा ग्रह शनी हे आप्पापल्या कक्षेत सूर्याभोवती फिरत असतात. गुरु ग्रहाला सूर्यभोवती फिरण्यासाठी पृथ्वीच्या ११ पूर्णांक ८६ वर्षे लागतात व स्वतः भोवती फिरण्यासाठी ९ तास ५५ मिनिटे व २९ सेकंद एवढा वेळ लागतो.शनी ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यसाठी पृथ्वीच्या २९ पूर्णांक ४६ वर्ष एवढा कालावधी तर स्वतः भोवती फिरण्यास १० तास ३९ मिनिटे व २२ सेकंद एवढा वेळ लागतो .हे दोनी ग्रह सूर्याभोवती फिरत असताना ते एका वेळेस अशा ठिकाणी येतात कि पृथ्वीवरून पाहताना ते दोन ग्रहांच्या ऐवजी एक ग्रह अथवा दोन ग्रहांची जोडी असल्यासारखे वाटतात. इंग्रजी मध्ये याला कॉन जंकशन असे म्हणतात.असे जरी असले तरी ते ग्रह एकमेकांपासून फार लांब अंतरावरती असतात.गुरुचे पृथ्वी पासूनचे अंतर यावेळेस ५ पूर्णांक ९२ अस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढे असणार आहे तर शनीचे अंतर १० पूर्णांक ८२ अस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढे असणार आहे.म्हणजेच ते एकमेकांपासून ४ पूर्णांक ९० अस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढे अंतर लांब आहेत. एक अस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे १४ कोटी ९५ लाख ९७ हजार ८७१ किलोमीटर. १५ डिसेंबर पासून संध्याकाळी सूर्य मावल्यानंतर हे दोन्ही ग्रह पश्चिमे कडे रात्री ९वाजून १५ मिनिटापर्यंत आपण पाहू शकता. वरच्या बाजूला असणारा ग्रह शनी तर त्याच्या खालच्या बाजूला असणारा ग्रह गुरु आहे .२१डिसेंबर ला ते एकमेकांच्या जवळ म्हणजेच ते एकमेकां पासून 0.1 डीग्री म्हणजेच आपल्या चन्द्राच्या व्यासाच्या १ पंचमांश पट अंतर एवढे शेजारी असल्यासारखे दिसणार आहेत.या तारखे नंतर मात्र ते पश्चिम दिशेला एक्मेखापासुन लांब जाताना दिसणार आहेत यावेळी मात्र त्यांचं क्रम बदलनार आहे.यानंतर असाच सोहळा बगण्यासाठी आपणाला १५ मार्च २०८० सालापर्यंत वाट बगावी लागणार आहे.या तारखेला याच्यापेक्षा जास्त चांगली स्थीती पूर्वे दिशेला पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी पाहावयास मिळणार आहे.
Join and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.