सोलापूर – टेंभुर्णी ( ता. माढा, जि. सोलापूर ) येथील काव्यपुष्पांजली मंडळाचे सन २०२३ चे माय-बाप स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संयोजक हरिश्चंद्र पाटील व दत्तात्रय भुजबळ यांनी दिली आहे.
माय-बाप स्मृती साहित्य पुरस्कार सन -२०२३ साठी एकूण २०० प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून चार सर्वोत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या आहेत. त्या अशा –
🌹 १)सर्वोत्कृष्ट कथासंग्रह
माणसातला राजा – लेखक – बा. ना. धांडोरे, पंढरपूर. यांना कै. दशरथ बळवंत पाटील व कै. मालनबाई दशरथ पाटील स्मृती साहित्य पुरस्कार.
🌹 २) सर्वोत्कृष्ट कादंबरी-
भुईपाश- लेखक – अशोक कोकाटे, भेडसगाव, जि. कोल्हापूर यांना कै. कोंडिबा नारायण भुजबळ व कै. यमुनाबाई कोंडिबा भुजबळ स्मृती साहित्य पुरस्कार
🌹 ३) सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह-
माणुसकीचं आभाळ – कवी – रामचंद्र इकारे, बार्शी, जि . सोलापूर यांना कै.दशरथ बळवंत पाटील व कै. मालनबाई दशरथ पाटील स्मृती साहित्य पुरस्कार.
🌹 ४) सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह –
जीव रानात गहाण- कवी – अशोक गायकवाड, पारोळा, जि. संभाजीनगर. यांना कै. कोंडिबा नारायण भुजबळ व कै. यमुनाबाई कोंडिबा भुजबळ स्मृती साहित्य पुरस्कार.
🌹 ५) सर्वोत्कृष्ट वाचक –
जयवंत पोळ, टेंभुर्णी, जि. सोलापूर यांना कै. दशरथ बळवंत पाटील व कै. मालनबाई दशरथ पाटील स्मृती साहित्य उत्कृष्ट वाचक पुरस्कार
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.