सांगली : साहित्यिक सचिन वसंत पाटील यांनी संपादीत केलेल्या ‘मायबोली रंग कथांचे’ या कथासंग्रहास कराड येथील शब्दशिल्प साहित्य संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय “शब्दशिल्प उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार” जाहीर करण्यात आला असून, मान्यवर समीक्षकांनी एकमताने या संग्रहाची निवड केली आहे, असे संयोजक डॉ. सुहासकुमार बोबडे यांनी कळविले आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
मुंबईच्या शब्दान्वय प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या कथासंग्रहात महाराष्ट्रातील विविध भागात बोलल्या जाणाऱ्या मराठीतील बाविस बोली भाषेतील कथांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील विविध भागात बोलल्या जाणाऱ्या या बोलीभाषा म्हणजे आपली संस्कृती, अस्मिता आणि स्वाभिमान आहेत, त्यांची जपणूक झाली पाहिजे यासाठी पाटील यांचा हा अनोखा प्रयोग मायमराठीला समृद्ध करणारा आहे.
ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनीही दिल्ली येथे भरलेल्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात या पुस्तकाचे कौतुक केले होते. सदर कथासंग्रहास महाराष्ट्रातून रसिक वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून यापूर्वी कथासंग्रहास कै. रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार लातूर, अक्षरगौरव पुरस्कार सातारा, मुक्तसंवाद साहित्य प्रेरणा पुरस्कार, स्वदेशी भारत साहित्य सन्मान, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कार इत्यादी राज्यस्तरीय पुरस्कार लाभले आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
