पावसाची तीव्रता पाहता मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १७ जिल्ह्यात ७ जून पासून मध्यम तर ९ जूनपासून जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
१- मान्सून कुठपर्यंत पोहोचला?
मान्सून त्याच्या सरासरी तारखेप्रमाणे आज गोवा, दक्षिण कर्नाटक,दक्षिण आंध्रप्रदेश पर्यन्त पोहोचला. मान्सून पुढे सरसावण्यासाठी अनुकूल वातावरण जाणवत आहे. काल (मंगळवार दि. ४ जूनला) महाराष्ट्रातील बराचश्या भागात तुरळक ठिकाणी मान्सून पूर्व वळीव पावसाने हजेरी लावली.
२- मान्सून महाराष्ट्रात कधीपर्यंत पोहोचण्याची शक्यता?
आजपासुन, सोमवारी ( दि. १० जूनपर्यंतच्या) पाच दिवसादरम्यान महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी, पुणे दक्षिण, नगर दक्षिण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर पर्यंतच्या १२ जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून कधीही हजेरी लावण्याची शक्यता जाणवते. तत्पूर्वी मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची दाट शक्यता जाणवते.
३- महाराष्ट्रातील उर्वरित २४ जिल्ह्यात मान्सूनपूर्व वळीव पावसाची शक्यता जाणवते.
४- सध्याच्या आठवड्यातील पावसाची तीव्रता कशी असु शकते.
पावसाची तीव्रता पाहता मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १७ जिल्ह्यात ७ जून पासून मध्यम तर ९ जूनपासून जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
- नेपाळ मधील राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा गंभीर परिणाम
- दीप तारांगण क्रिएशन्सचे नाट्य- चित्रपट, साहित्य, चळवळ पुरस्कार जाहीर
- हळद उत्पादक शेतकऱ्यांची हाक — वायदे बाजाराचे रक्षण करा
- महाराष्ट्रात काहीशी उघडीपच पण विदर्भ वगळूनच
- कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.