शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – कृषी विज्ञान केंद्राचे ( KVK ) आवाहन
नारायणगाव (पुणे) – येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या (KVK) वतीने नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत “नैसर्गिक निविष्ठा निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम” आयोजित केला आहे. बुधवारी ( ता. १९ नोव्हेंबर २०२५ ) रोजी शेतकऱ्यांसाठी हे मोफत प्रशिक्षण असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या तर्फे करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणात जीवामृत, बीजामृत, दशपर्ण अर्क इत्यादी नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याच्या पद्धती, त्यांचे फायदे आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी नैसर्गिक निविष्ठा अत्यंत उपयुक्त असून हा कमी खर्चिक उपाय आहे.
रासायनिक खतांवरील अवलंबन कमी करून पर्यावरणस्नेही शेतीकडे वाटचाल करण्यासाठी असे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नैसर्गिक निविष्ठा स्वतः तयार करण्याचे कौशल्य आत्मसात करावे. बुधवारी ( ता. १९ ) सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (KVK, Narayangaon) येथे हे प्रशिक्षण होणार आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी योगेश यादव (मुद्राशास्त्रज्ञ ): ८२७५००५२१२ व राहुल घाटगे (कृषी विस्तार तज्ञ): ९४२२०८००११ यांच्याशी संपर्क साधावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
