December 15, 2025
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, रायगड येथे २८-२९ सप्टेंबर २०२५ रोजी निसर्गानुभव कार्यशाळा. जैवविविधता, निसर्गभ्रमंती, पर्यावरण संगीत व चर्चांद्वारे निसर्गसंवर्धनाची जाणीव.
Home » साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथे निसर्गानुभव कार्यशाळा
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथे निसर्गानुभव कार्यशाळा

रायगडमध्ये निसर्गानुभव कार्यशाळा : जैवविविधतेचे संवर्धन व निसर्ग सहवासाचा अनुभव

रायगड : येथील जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्र यांच्या वतीने दिनांक २८ व २९ सप्टेंबर २०२५ रोजी निसर्गानुभव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वडघर येथे असलेल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात पार पडणार आहे. या कार्यशाळेचा उद्देश निसर्ग सहवासातून आनंद मिळवणे, कोकणच्या निसर्गाकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहणे, जैवविविधतेच्या संकल्पनेची ओळख करून घेणे तसेच पर्यावरण जतन आणि संवर्धनाबद्दल विचार करणे हा आहे, अशी माहिती कार्यशाळेचे संयोजकांनी दिली.

या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक प्रसिध्द जैवविविधता तज्ज्ञ पार्थ बापट असणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना निसर्गाचा अनुभव घेता घेता वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याची संधी मिळणार आहे.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात सध्या जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्र कार्यरत आहे. या केंद्रामार्फत विविध कार्यक्रम, उपक्रम, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्प सातत्याने राबविले जातात. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, जैवविविधता संशोधक, पर्यावरण कार्यकर्ते आणि अभ्यासक यांच्यासाठी या केंद्रातर्फे अशा शैक्षणिक व उपयुक्त कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

निसर्गानुभव कार्यशाळा शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार असून ती रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत चालणार आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत सहभागींना विविध उपक्रमांचा अनुभव घेता येईल. कार्यशाळेतील मुख्य कार्यक्रमांमध्ये परिसर भ्रमंती, वृक्ष-वेली, प्राणी-पक्ष्यांची ओळख, निसर्ग खेळ, जैवविविधता व माणूस यातील संबंधांवर आधारित उपक्रम, पर्यावरण-संगीत, माहितीपटांचे प्रदर्शन तसेच चर्चा व गप्पांचा समावेश आहे.

या कार्यशाळेत १२ ते ५५ वयोगटातील व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. निसर्गाशी मैत्री करताना सहभागी व्यक्तींना केवळ आनंद मिळणार नाही तर पर्यावरण जतनाचे महत्त्वही पटवून दिले जाणार आहे. पर्यावरण संवर्धनाशी निगडित उपक्रमांद्वारे कार्यशाळा अधिक परिणामकारक होईल, असा आयोजकांचा विश्वास आहे.

संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश हा की, सामान्य माणसाने निसर्गाशी जोडले जावे, जैवविविधतेची किमया समजून घ्यावी आणि तिच्या जतनासाठी स्वतःला बांधिल मानावे. आजच्या वेगवान आणि प्रदूषणमय जीवनशैलीत निसर्ग सहवासातून आनंद मिळवणे, ही अत्यावश्यक गरज असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी स्मारक कार्यालय (७७७६९३७८४४), चिंतामणी (९६५७६५१०३५) किंवा राहुल (९८६०६१९०३१) या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील कोकणाचा समृद्ध निसर्ग आणि साने गुरुजींच्या स्मारकाचे प्रेरणादायी वातावरण यात होणारी ही कार्यशाळा जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणारी आणि पर्यावरण संवर्धनाची गोड शिकवण देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

1 review

Devram Sarjerao Karpe September 17, 2025 at 1:50 PM
Sane Guruji Vachnalay

श्री.देवराम सर्जेराव कर्पे (अध्यक्ष )
पुज्य साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय पढेगाव ता-कोपरगाव जिल्हा-अहिल्यानगर ४२३६०३

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading