कोल्हापूर – येथील वनौषधी विद्यापीठ संस्थेच्या वतीने दहावी व बारावी पास/ नापास विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांचा पंचकर्म सहाय्यक अभ्यासक्रम सुरू होत आहे.
अलीकडच्या काळात आयुर्वेद विद्या शाखेत विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू होत आहेत. त्यापैकी पंचकर्म सहाय्यक हा अभ्यासक्रम दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरचा मार्ग म्हणून उपलब्ध झाला आहे. आयुर्वेद महाविद्यालय, आयुर्वेद हॉस्पिटल्स् अशा ठिकाणी रुग्णांना पंचकर्म उपचार प्रभावी ठरत आहेत. विविध रोगांवर चिकित्सा तसेच निरोगी व्यक्तींचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी पंचकर्मातील विविध उपचार हे प्रभावी ठरत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पंचकर्म सहाय्यक तंत्रज्ञांची गरज निर्माण झाली आहे.
पंचकर्मातील स्नेहन, स्वेदन, नेत्र बस्ती, कटी बस्ती शिरोधारा, जानू बस्ती, शिरो बस्ती आदी क्रिया तसेच वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण इत्यादी प्रधान पंचकर्म करण्यासाठी सहाय्य करणे या गोष्टी या सहा महिन्यांच्या पंचकर्म सहाय्यक अभ्यासक्रम थेरी आणि प्रॅक्टिकल सह शिकवल्या जातील. दहावी आणि बारावी पास / नापास विद्यार्थ्यांना आपल्या करिअरचा हा एक उत्तम मार्ग आहे.
स्वास्थ्यअर्थम् आयुर्वेद पंचकर्म सेंटर येथे आंतरराष्ट्रीय किर्तीच्या आयुर्वेदाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम आठवड्यातून दोन वेळा शिकवला जाईल. गरजू विद्यार्थ्यांनी स्वास्थ्यार्थम् आयुर्वेद पंचकर्म सेंटर, १४४९ सी, लक्ष्मी पुरी, माय टीव्हीएस शेजारी, कोल्हापूर येथे सकाळी दहा ते एक वाजे पर्यंत संपर्क साधावा.
माहितीपत्रक आणि प्रवेश अर्जासाठी भेटावे. गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत फी मध्ये सवलत आणि शिष्यवृत्ती दिली जाईल मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुकांनी त्वरित भेटावे, असे सेंटरच्या वतीने एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.