राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर: सुधाकर मानकर, दशमुखे गुरूजी, डॉ. लेनगुरे, नारनवरे, पावडे, खुणे, साव यांची निवड
चंद्रपूर – राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने देण्यात येणारे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. केंद्रीय समितीची व आणि संमेलन आयोजन समितीची सभा चंद्रपूर येथे झाली. हे पुरस्कार राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन सांगडी (जि. आदिलाबाद ) येथे येत्या ६ व ७ मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे . पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व रोख रक्कम आहे .
पुरस्कारासाठी निवड झालेले मान्यवर असे –
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विचारकृती पुरस्कार – श्री सुधाकर मानकर माजी सरपंच जरूड, जि. अमरावती यांना; कर्मयाेगी श्रीतुकारामदादा गीताचार्य स्मृती सेवा पुरस्कार – गुणवंतराव चिंचाेलकर यांना; डाॅ. माेतीजी महाराज सेवाश्रम सांगडी द्वारा पुरस्कृत श्रीगुरूदेव वैद्यकिय सेवा पुरस्कार – डाॅ. चंद्रकांत लेनगुरे,गडचिराेली यांना; दिवं. जगन्नाथजी गावंडे स्मृती श्री गुरूदेव सेवा पुरस्कार – श्रीधर पाटील भेदाेडकर यांना; दिवं. माधव पा. जेनेकर स्मृती श्रीगुरुदेव कृषीसेवा पुरस्कार – श्री प्रेमेश्वर बारसागडे (मुंडीपार), जि. गाेंदिया यांना; डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रचार पुरस्कार-उध्दवराव नारनवरे, आंबेडकरी साहित्यीक गाेंडपिपरी यांना; साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार -श्री सुभाष पावडे (विरूर स्टेशन) यांना ; पंढरीनाथ चंदनखेडे पुरस्कृत श्रीगुरुदेव गाेसेवा पुरस्कार – श्री प्रल्हाद खुणे, (आंधळी) यांना; दिवं. लटारी उगे स्मृती व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार -माराेती साव, ऊर्जानगर यांना ;दिवं.गंगाधरराव घाेडमारे स्मृती संशाेधन पर लेखन पुरस्कार – डाॅ. श्रावण बाणासुरे, बल्लारपूर यांना ;दिवं. तुळसाबाई गाेपाळ चाैधरी स्मृती उत्कृष्ट लाेक कलावंत पुरस्कार
– चेतन ठाकरे आरमाेरी यांना; दिवं. सदारामजी पारधी स्मृती श्रीगुरुदेव उत्कृष्ट भजन सेवा पुरस्कार -श्री बळीराम बाेबडे राजुरा यांना ;दिवं. यशवंत बाेबडे स्मृती श्री गुरुदेव श्रमश्री पुरस्कार – नंदकिशाेर देविदास भैरवार यांना ; दिवं. पुरुषाेत्तम हिरादेवे स्मृती पदावली भजन सेवा पुरस्कार – पांडुरंग दादाराव भाेयर यांना ; राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज शिक्षक पुरस्कार- नामदेव पिज्दूरकर मुल यांना;
दिवं. किशनराव नवघरे स्मृती श्रीगुरुदेव प्रचार पुरस्कार – श्री. उध्दव बेलूरकर श्रीक्षेत्र वरखेड (अमरावती) यांना; दिवं. आनंदाबाई मत्ते स्मृती श्रीगुरुदेव सेवाभावी दाम्पत्य पुरस्कार -केशवराव दशमुखे गुरूजी पाेर्ला यांना ; दिवं. कर्णुजी देवाळकर स्मृती ग्रामनाथ पुरस्कार -श्री. नरसा रेड्डी सामावार यांना ;दिवं. किसनराव भेदाेडकर स्मृती श्रीगुरुदेव दानशूर पुरस्कार – डाॅ. हर्षानंद हिरादेवे, बाखर्डी यांना ; दिवं. गणेश भेदाेडकर स्मृती उत्कृष्ट श्रीगुरुदेव सेवा मंडळ पुरस्कार -श्रीगुरुदेव सेवा मंडळ, कळमगाव (गन्ना) यांना ; दिवं. पाेच्चक्का मंचलवार स्मृती श्रीगुरुदेव कीर्तन सेवा पुरस्कार
-सुधाकर चाैधरी महाराज तपाेभूमी गाेंदाेडा यांना; दिवं. शाेभाताई भेदाेडकर स्मृती ज्येष्ठ झाडीपट्टी कलावंत पुरस्कार -पुरुषाेत्तम लांजेवार कवडशी (चिमूर) यांना ; दिवं. चिमनाबाबू झाडे माजरी स्मृती सामाजिक सेवा कार्य पुरस्कार – सुरेश पंढरी वल्लेवार यांना ; दिवं. शाेभाताई हिरादेवे स्मृती माता मंजुळा प्रचारीका पुरस्कार – साै. इंदिराबाई कुडे, सास्ती यांना; दिवं. प्राे.बबनराव डाेहे स्मृती गुणवंत विद्यार्थी सन्मान – कु. माेक्शा सामावार, कु. तृप्ती मालेकर, श्री सूरीदास अड्डीकवार,श्री. वेदन नवघरे या चार विद्यार्थ्यांना जाहीर झालेला आहे.
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे चैतन्य युवा पुरस्कार असे
विनायक सोयाम, सचिन झाडे, बिसने, देवाळकर , खाडे, पारटकर यांची निवड
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने देण्यात येणारे चैतन्य युवा पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. केंद्रीय समितीची व आणि संमेलन आयोजन समितीची नुकतीच सभा चंद्रपूर येथे संपन्न झाली. सदर पुरस्कार राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन सांगडी (जि. आदिलाबाद )येथे येत्या ६ व ७ मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे . पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व गौरवचिन्ह , शाल असे आहे . पुरस्कारासाठी खालील मान्यवराची निवड करण्यात आलेली आहे.
विनायक सोयाम (पंचाळा), पालीकचंद बिसणे( सिंदीपार), सतीश देवाळकर (अंतरगाव- खुर्द), भालचंद्र पारटकर (सांगडी) , सचिन झाडे (माजरी) ,श्रीनिवास खाडे (कोब्बई) या सहा जणांना जाहीर झालेला आहे.
निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे संमेलन समितीच्या वतीने भाऊ पत्रे , बळीराम बोबडे , संजीव पोडे, महेश सावलानी, नारायण सहारे, इंजि. विलास उगे, श्रीकांत धोटे, डॉ . गावंडे, विलास चौधरी, देवराव कोंडेकर, स्वागताध्यक्ष प्रभाकरजी नवघरे, संजय तिळसमृतकर, शिवाजी भेदोडकर, भूमा रेड्डी, एड. राजेंद्र जेनेकर , प्रा. नामदेव मोरे, महेंद्र दोनोडे, प्रेमलाल पारधी , आदींनी अभिनंदन केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.