प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला अग्रिम अंदाज जाहीर
नवी दिल्ली – वर्ष 2022-23 साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचे पहिले अग्रिम अंदाज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जाहीर केले आहेत. यासंदर्भात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, खरीप हंगामात 149.92 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची मेहनत, शास्त्रज्ञांची प्रगल्भता आणि शेतकरी हिताची सरकारची धोरणे यामुळे कृषी क्षेत्राचा दिवसेंदिवस विकास होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
पहिल्या अग्रिम अंदाजानुसार, 2022-23 साठी प्रमुख खरीप पिकांचे अंदाजे उत्पादन असे :
- अन्नधान्य – 149.92 दशलक्ष टन.
- तांदूळ – 104.99 दशलक्ष टन.
- पोषण / भरड तृणधान्ये – 36.56 दशलक्ष टन.
- मका – 23.10 दशलक्ष टन. (विक्रम)
- डाळी – 8.37 दशलक्ष टन.
- तूर – 3.89 दशलक्ष टन.
- तेलबिया – 23.57 दशलक्ष टन.
- भुईमूग – 8.37 दशलक्ष टन.
- सोयाबीन – 12.89 दशलक्ष टन.
- कापूस – 34.19 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 170 किलो)
- ज्यूट आणि मेस्टा -10.09 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 180 किलो)
- ऊस – 465.05 दशलक्ष टन (विक्रमी)
2022-23 च्या पहिल्या हंगामी अंदाजानुसार (फक्त खरीप), देशात एकूण अन्नधान्य उत्पादन 149.92 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. तो मागील पाच वर्षांच्या (2016-17 ते 2020-21)सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा 6.98 दशलक्ष टन अधिक आहे..
2022-23 मध्ये खरीप तांदळाचे एकूण उत्पादन 104.99 दशलक्ष टन अंदाजित आहे. मागील पाच वर्षांचे (2016-17 ते 2020-21) सरासरी उत्पादन 100.59 दशलक्ष टन होते. त्यापेक्षा ते 4.40 दशलक्ष टनांनी जास्त आहे.
2022-23 मध्ये देशात मक्याचे उत्पादन विक्रमी 23.10 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. सरासरी 19.89 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा तो 3.21 दशलक्ष टन अधिक आहे.
खरीप पोषक/ भरड तृणधान्यांचे उत्पादन अंदाजे 36.56 दशलक्ष टन आहे जे सरासरी 33.64 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 2.92 दशलक्ष टन अधिक आहे. 2022-23 मध्ये एकूण खरीप डाळ उत्पादन 8.37 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे.
2022-23 मध्ये देशातील एकूण खरीप तेलबियांचे उत्पादन 23.57 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. जे सरासरीपेक्षा 1.74 दशलक्ष टन अधिक आहे.
2022-23 मध्ये देशातील उसाचे एकूण उत्पादन 465.05 दशलक्ष टन इतके विक्रमी असल्याचा अंदाज आहे. 2022-23 मधील उसाचे 373.46 दशलक्ष टन ऊस उत्पादन सरासरीपेक्षा 91.59 दशलक्ष टनांनी जास्त आहे.
कापसाचे उत्पादन अंदाजे 34.19 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 170 किलो) आणि ताग आणि मेस्ताचे उत्पादन अंदाजे 10.09 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 180 किलो) आहे.