मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाड.मय अभ्यासावर आधारित स्पर्धा
विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाड.मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध व्हावे हा उद्देश
हा पुरस्कार प्रदान सोहळा प्रतिवर्षी मातृमंदिर वर्धापनदिनी म्हणजे सौर १ मार्गशीर्ष ( २२ नोव्हेंबर ) या दिवशी
पुणे – निगडी येथील मातृमंदिर संस्थेच्यावतीने पुरस्कारासाठी संत साहित्यावरील पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, पुस्तके १५ ऑगस्टपूर्वी संस्थकडे पाठवावीत, अशी माहिती सु. मा. कुलकर्णी यांनी दिली आहे
येथील मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाड.मय अभ्यासावर आधारित स्पर्धा घेत असते. विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाड.मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध झाले पाहिजे असें वाटते. असें वाड.मय विविध शाळांना सुचवता यावे, वाड.मय वाचकांसमोर ठेवणारे लेखक आणि प्रकाशक यांना प्रोत्साहन देता यावे, त्यासाठी पुरस्कार देण्याच्या निमित्ताने लेखक आणि प्रकाशक वाचकांसमोर यावेत या हेतूने संत वाड.मयविषयक पुस्तकांना पुरस्कार संस्थेतर्फे देण्यात येतात. हा पुरस्कार प्रदान सोहळा प्रतिवर्षी मातृमंदिर वर्धापनदिनी म्हणजे सौर १ मार्गशीर्ष ( २२ नोव्हेंबर ) या दिवशी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, पुणे 44 या ठिकाणी आयोजित केला जातो.
पूर्वीच्या दोन सौर वर्षात प्रकाशित झालेल्या संतविषयक मराठी साहित्याचा पुरस्कारासाठी विचार केला जातो. ( मागील दोन इसवी सनामध्ये प्रकाशित झालेले साहित्य ). यामध्ये संत साहित्याचे परीक्षण ( टीका, विवेचन ) संतचरित्रे, संताच्या कार्यावरील विवेचनात्मक लेखन, संत जीवनावर आधारित ललित साहित्य ( कथा, कादंबरी, काव्यकोश इत्यादी सर्व प्रकारचे साहित्य ) पुरस्कारासाठी दोन प्रतीत पाठविण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. १०० पेक्षा अधिक पृष्ठांच्या मोठ्या सर्वोत्कृष्ट दोन पुस्तकांना अनुक्रमे रु. १०,००० /- आणि रु .८००० /- असें दोन पुरस्कार (६० % लेखकांस आणि ४० % प्रकाशकांस ) दिले जातात. त्याशिवाय बालवाड.मयातील ( १०० पृष्ठांच्या आतील ) संतकथा, संतचरित्र, संतवचनसंग्रह अशा स्वरूपातील दोन पुस्तकांना ( ६० % लेखकास/ ४० % रक्कम प्रकाशकास या प्रमाणात ) प्रत्येकी रु. २५००/- चे पुरस्कार दिले जातात.
संस्थेकडून संतसाहित्याचे समीक्षक किंवा लेखक अशा तीन ख्यातनाम तज्ञाच्या समितीकडून परीक्षण करून पुरस्कारांची पात्रता ठरवली जाते. तरी इच्छुक लेखक – प्रकाशकांनी पुरस्कारासाठी प्रत्येक पुस्तकाच्या दोन प्रती सौर २४ श्रावण (१५ ऑगस्ट) पर्यंत संस्थेकडे पाठवावीत. पुस्तके मराठी भाषेतील तथापि कोणत्याही भारतीय संताविषयीची असावीत. संत कोणत्याही कालखंडातील असले तरी चालेल.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
मातृमंदिर विश्वस्त संस्था, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पेठ क्र. २५, निगडी, पुणे ४११०४४
दूरभाष क्र. २७१६८००० / ९७६५१३५७६९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
