June 6, 2023
Send Books To MASAP for Marathi Literature award
Home » साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे मसापचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे मसापचे आवाहन

पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदच्यावतीने दरवर्षी मराठी राजभाषा दिनानिमित्त काही विशेष पुरस्कार दिले जातात. सन २०२२ च्या या विविध पुरस्कारांसाठी प्रकाशित पुस्तकांच्या २ प्रती पाठवण्याचे आवाहन मसापच्यावतीने करण्यात आले आहे. यंदाच्यावर्षी विनोदी साहित्य, व्यक्तिचित्रविषयक, ललीत, इतिहास आदी विभागातील पुस्तकांसाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत.

सन २०२० वा २०२१ या दोन वर्षात प्रकाशित पुस्तकांसाठी असे पुरस्कार –

१.कै. चिं. वि. जोशी पुरस्कारः- विनोदी साहित्याच्या पुस्तकासाठी.

२.कै.विद्याधर पुंडलिक पुरस्कारः- व्यक्तिचित्रविषयक पुस्तकासाठी. 

सन २०२१या वर्षात प्रकाशित पुस्तकांसाठीः-

१.कै. निर्मला मोने पुरस्कारः- ललित लेखांच्या पुस्तकासाठी.

२.कै. रा. श्री जोग पुरस्कारः- समीक्षा लेखांच्या पुस्तकासाठी.

 ३.कै. सुहासिनी इर्लेकर पुरस्कारः- नवोदित कवीच्या पहिल्या कवितासंग्रहासाठी.

 ४.कै. शं. ना. जोशी पुरस्कारः- सामाजिक/ सांस्कृतिक/वैचारिक लेखांच्या पुस्तकासाठी.

 ५.कै.द.वा.पोतदार पुरस्कारः- इतिहासविषयक पुस्तकासाठी.

६.कै.कवी यशवंत पुरस्कारः- उत्कृष्ट कवितासंग्रहासाठी.

या सर्व पुरस्कारांसाठी लेखक व प्रकाशकांनी १२ जानेवारी 2022 पुस्तकांच्या २ प्रती कार्यवाह-(विशेष पारितोषिके) महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०. दूरध्वनी क्रमांकः०२०-२४४७५९६३. या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन मसापच्यावतीने करण्यात आले आहे.

Related posts

झाडीपट्टीतील साहित्यिक, कलावंतांना पुरस्कारासाठी आवाहन

पंढरपूरच्या श्री रूक्मिणीमातेची दुर्गादेवीच्या रुपात पुजा

संस्कृतीबरोबरच पर्यावरणाची जनजागृती करणारी नाटिका…

Leave a Comment