June 19, 2024
show-must-go-on-anand-kale-post
Home » शो मस्ट गो ऑन…
काय चाललयं अवतीभवती

शो मस्ट गो ऑन…

आपण समजतो अभिनेत्यांना फारसे काही काम नसते. पण काही अभिनेते इतके व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या कामातून वेळ काढणेही जमत नाही. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम करत असलेला अभिनेता आनंद काळे याचेही सध्या असेच झाले आहे. त्याला बाईक राईडचा छंद आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. या छंदासाठी त्याला वेळ देता येत नाहीये. पण यातूनही वेळ काढून त्याने काश्मीर- लेह – लडाख या २२ दिवसांच्या ७००० किलोमीटरच्या बाईक राईडमध्ये सहभागी घेतला. पण काम काही त्याची पाठ सोडत नाही. एकीकडे छंद आणि दुसरीकडे काम हे दोन्हीही सांभाळताना त्याला मोठी कसरत करावी लागत आहे.

त्याचे झाले असे वेबसीरिजच्या चित्रिकरणाच्या तारख्या पुढे गेल्या म्हणून आनंदने बाईक राईडचा प्लॅन केला. २ जुलैला राईड सुरू झाली. पण चित्रिकरणाच्या तारखांचा मेळ घालताना त्याची मोठी कसरत झाली. ३० जून रात्रीपर्यंत त्याचे चित्रिकरण सुरु होते. तरीही त्याने रात्री ड्राईव्ह करून पहाटे ४.३० पर्यंत कोल्हापूर गाठले. सर्वकाही आवरण्यासाठी त्याला फक्त एक दिवसाचा कालावधी मिळाला. सर्व पॅकिंग करून, नींजाच सर्व्हिसिंग, टायर बदलणे, तसेच कोल्हापूरमधील त्याच्या बिझनेसची काम हे सर्व उरकून २ जुलैला पहाटे ३.३० ला त्याने राईड स्टार्ट केली. ९५० किलोमीटरवरील गुजरातमधील हलोल या ठिकाणी आनंदने “DETOUR” ग्रुप ला गाठलं…

कोल्हापूर, मुंबई, चंदिगढ, श्रीनगर, सोनामार्ग असा प्रवास करून तो तूर्तुकला पोहोचला. तिकडे मोबाईलला नेटवर्क नसल्याने त्याचा कोणीशीही संपर्क होत नव्हता. अशातच “माझी तुझी रेशीमगाठ” मध्ये काही सिन आल्यामुळे प्रोडक्शन हाऊसने आनंदला संपर्क करण्याचा प्रयत्न केला.. शेवटी ११ तारखेला संध्याकाळी प्रोडक्शन हाऊस आनंदशी संपर्क करण्यात यशस्वी झाले आणि १३ तारखेला चित्रिकरण असल्याचं आनंदला सांगण्यात आले. त्यावेळी आनंद पाकिस्तान बॉर्डरवरील थांग नावाच्या गावात होता. १३ ला सकाळी मुंबईत चित्रिकरण होते. तेथून आनंदने थांग, तुर्तुक, हुंडर, परत एकदा खरदुंगलापास करून लेह असा ११ तासाचा प्रवास करून विमान पकडले. लेह ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा विमानप्रवास करून तो १३ तारखेला सेट वर पोहोचला.

अति उंच (High altitude)तसेच कमी ऑक्सिजनच्या ठिकाणावरून मुंबई आणि चित्रिकरण संपवून पुन्हा लगेच परत लेह एकदम ओकेमध्ये. लेहमध्ये आनंदने निंजा १००० पार्क केली होती. ती घेऊन तो परत राईडच्या ग्रुपमध्ये सहभागी झाला. बऱ्याच जणांकडून आनंदला विचारणा होत होती की २२ दिवस कसे सीरियल सोडून जाऊ शकतोस. त्या सगळ्यांसाठी आनंदने SHOW MUST GO ON…असे म्हणत धक्का दिला आहे.

Related posts

आंतर सांस्कृतिक रुची आणि सहयोग वाढवणे हा चित्रपट महोत्सवाचा मुख्य उद्देश

बांधकामविश्वाची समृद्ध भ्रमंती

मधुर फळांसाठी हवेत चांगल्या विचारांचे फुटवे

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406