कोकणभूमी लिंगभेदा पासून दूर – न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर जोशी
चिपळूण – न्यायाधीश डॉ. उज्वला मुसळे लिखित गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम, १९९४ च्या अंमलबजावणीमध्ये न्यायव्यवस्थेची भूमिका ह्या पुस्तकाचा प्रकाशन मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर जोशी, रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी, जिल्हा न्यायाधीश चिपळूण डॉ. अनिता एस. नेवसे, चिपळूण बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. एन. एस. सावंत, माजी मुख्याध्यापक टी. डी. मुसळे व ओमप्रकाश चव्हाण यांच्या हस्ते झाले.
प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजे यांनी लिंगभेदाचे तसेच विकसित तंत्रज्ञानाचे सामाजिक दुष्परिणाम आणि या पुस्तकाचे महत्व विषद केले. लेखिका न्यायाधीश डॉ. उज्वला मुसळे यांनी सर्वांबद्धल कृतज्ञता व्यक्त केल
घराघरात लिंगसमानते बद्दल लहानपणीच संस्कार केले तर हा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
न्यायाधीश मा. एस. एस. गोसावी यांनी ऐतिहासिक दाखले देत स्त्री शक्तीचे महत्व अधोरेखित केले. तसेच लिंगभेद कायद्याने बंद केले असले तरी गर्भात वाढणारे बाळ मुलगी आहे की मुलगा हे सांगण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जात असल्याचे सांगितले. जसे की डॉक्टरांच्या केबिन मधील देवीचे किंवा देवाचे दर्शन संबंधित स्त्रीला घ्यायला लावून गर्भाचे लिंग काय आहे ते अप्रत्यक्षपणे सांगण्याचा नवा फंडा आला असल्याचे ते म्हणाले.
न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर जोशी यांनी जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा ह्या जोरावर न्याय व्यवस्थेत असतानाही संशोधन करून पी. एच. डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल, शोधनिबंध व पुस्तके प्रकाशित केल्याबद्दल बद्धल, तसेच दोन पोस्ट ग्रॅज्युइट डिप्लोमा पूर्ण केल्याबद्धल लेखिका डॉ. उज्वला मुसळे यांचे कौतुक केले. हे पुस्तक न्यायनिवाडा करताना सर्व न्यायाधिशांना खूप उपयोगाचे राहील असे नमूद करून सर्व सोनोग्राफी सेंटरवर हे पुस्तक पोहोचवावे असे आवाहनही त्यांनी केले. वर्तमान काळात विविध क्षेत्रात मुली व महिला मोठ्या प्रमाणात पुढे येताहेत हे अत्यंत आशादायक चित्र आहे. हे चित्र अधिक दृढ करण्यासाठी या पुस्तकाचे योगदान राहील अशी अशा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी, एड. एन. एस. सावंत, प्रकाशक ओमप्रकाश चव्हाण, माजी मुख्याध्यापक टी. डी. मुसळे व माजी मुख्याध्यापक कानडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन धनंजय चितळे यांनी तर आभारप्रदर्शन एड. नयना पवार यांनी केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.