December 5, 2024
The first panel discussion at the 5th IFFI focused on women safety and cinema
Home » 5 व्या ‘इफ्फी’ मध्ये पहिल्या पॅनल चर्चेमध्‍ये महिला सुरक्षा आणि चित्रपट यावर प्रामुख्याने भर
मनोरंजन

5 व्या ‘इफ्फी’ मध्ये पहिल्या पॅनल चर्चेमध्‍ये महिला सुरक्षा आणि चित्रपट यावर प्रामुख्याने भर

IFFIWood, गोवा – येथे सुरू असलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्‍ये (इफ्फी) पहिली पॅनल चर्चा महिला सुरक्षा आणि चित्रपट या विषयावरील संभाषणाने झाली. या संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती वाणी त्रिपाठी टिकू यांनी केले. या सत्राने चित्रपट निर्माते इम्तियाज अली, अभिनेत्री सुहासिनी मणिरत्नम, खुशबू सुंदर आणि भूमी पेडणेकर या पॅनेलच्या सदस्यांना एकत्र आणले. चित्रपट उद्योगातील महिलांची सुरक्षा, लिंग प्रतिनिधित्व आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या क्षेत्रात कार्यरत असलेल्‍या महिला करतात, त्‍याचबरोबर त्यांच्या सिनेमातील भूमिका सामाजिक मूल्यांना आकार देण्याचे काम करतात, असे पॅनल मधील वक्त्‍यांनी चर्चेत सांगितले.

ऑन-स्क्रीन म्‍हणजे, प्रत्यक्ष पडद्यावर आणि पडद्यामागेही चित्रपट उद्योग महिलांना अधिक चांगले समर्थन देवून सशक्त कसे करू शकतो , याबद्दल पॅनेलच्या सदस्यांनी वैयक्तिक अनुभव आणि अंतर्दृष्टी सामायिक केली. चित्रपटसृष्टीतील महिला छळ किंवा शोषणाची चिंता न करता मोकळेपणाने काम करू शकतील असे सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

वाईट कृत्य करणाऱ्या एखाद्याची ओळख पटल्यास चित्रपटाच्या सेटवर कसा प्रतिसाद दिला गेला पाहिजे, यावर महत्त्वपूर्ण चर्चा यावेळी झाली. पॅनेलच्या सदस्यांनी मान्य केले की, कामाच्या ठिकाणी लैंगिक अन्याय सहन करणे यापुढे स्वीकारार्ह असणार नाही. पुरुष कलाकार सेटवर अनेकदा कसे येतात आणि सीनमध्ये बदल सुचवतात, ही प्रथा महिलांसोबत क्वचितच घडते याचा अनुभव सुहासिनी मणिरत्नम यांनी सामायिक केला. महिलांनी देखील त्यांच्या कामाच्‍या ‘सीन’ ची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, हे अधोरेखित करून सुहासिनी म्हणाल्या, प्रतिनिधित्व करताना त्यांचा निष्क्रीय सहभाग असू नये, त्याऐवजी चर्चा करायला हवी. त्या पुढे म्हणाल्या की, क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी उद्योग व्यावसायिकांनी कामाची नैतिक मूल्ये समजून घेणे महत्त्वाचे आहे.

इम्तियाज अली यांनी अशी कार्यसंस्कृती निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर दिला, जिथे सेटवर असलेल्या महिला त्यांच्याशी कोण कसे वर्तन करतील, याची चिंता न करता केवळ कलेवर लक्ष केंद्रित करू शकल्या पाहिजेत. चित्रपट निर्माते सेटवर होणारा लैंगिक अन्याय सहन करू शकत नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या चर्चेत चित्रपटांमधील महिलांचे चित्रण आणि त्यांच्यासाठी सुरक्षित अवकाश निर्माण करण्यावर त्याचा थेट प्रभाव कसा पडतो, यावरही चर्चा झाली. अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी उत्कटतेने यावर आपली मत मांडली. त्‍या म्हणाल्या, महिलांची प्रतिष्ठा आणि पडद्यावर त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची पद्धत आदरयुक्त आणि सशक्त वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

अभिनेत्री खुशबू सुंदर यावेळी म्हणाल्या की, चित्रपट मनोरंजक बनविण्यासाठी लक्ष केंद्रित करत असताना, आपण जबाबदारीने काम करतो. इथे कामामध्‍ये समानता आणि आदराच्या तत्त्वांशी तडजोड होणार नाही याची खात्रीही करून घेतो. पॅनेलमधील सर्व सदस्यांनी एकमताने मान्य केले की, महिलांचे सन्मानाने चित्रण करणे हे केवळ पात्रांबद्दल नाही तर मोठ्या प्रमाणावर उद्योगासाठी एक आदर्श निर्माण करणे आहे.

या चर्चेत प्रेक्षकांचा देखील सक्रिय सहभाग दिसला. सिनेमातील महिलांच्या भूमिकेत होत असलेली उत्क्रांती आणि त्यांच्या सुरक्षिततेशी किंवा प्रतिष्ठेशी तडजोड न करता या उद्योगामध्‍ये त्यांना यशस्वी होण्यासाठी एक विशिष्‍ट स्‍थान कसे निर्माण करून देवू शकतो, याविषयी प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित केले.

इफ्फी 2024 मधील ही पहिली पॅनल चर्चा असल्यामुळे , या संभाषणाने या महोत्‍सवासाठी अशी वातावरण निर्मिती केली आहे जी न केवळ सिनेमाच्या कलेचाच उत्सव साजरा करत नाही तर सर्वांसाठी सुरक्षित, अधिक समावेशक भविष्य घडवण्याच्या उद्योगाच्या जबाबदारीचे समीक्षण या चर्चेव्‍दारे करण्‍यात आले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading