महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने 2.67 कोटी रुपयांचे सोने केले जप्त, मुंबई विमानतळावर तस्करी प्रकरणात दोघांना अटक
मुंबई – येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3,350 ग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची किंमत तब्बल 2.67 कोटी रुपये इतकी आहे. या तस्करी प्रकरणात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक कनिष्ठ कर्मचारी आणि ग्राहक सेवेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेचा अटक केलेल्यात समावेश आहे.
विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वारावर ग्राहक सेवेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेला थांबवले असता त्यावेळी तिच्याकडे द्रव्य स्वरूपात लपवून ठेवलेले सोने आढळले.
तपासात समोर आले की, विमानतळावरील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याने ‘इवाय 200’ या विमानाच्या वेस्ट कार्टमधून सोने बाहेर काढून ते एका महिला कर्मचाऱ्याकडे दिले. जेणेकरून ती महिला तिचा विमानतळ प्रवेश परवाना (एइपी) वापरून ते सोने बाहेर नेऊ शकेल. या दोन्ही व्यक्तींना सीमाशुल्क कायदा , 1962 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.