December 4, 2024
Two arrested after seizure of gold worth Rs 2.67 crore at Mumbai airport
Home » मुंबई विमानतळावर 2.67 कोटी रुपयांचे सोने जप्त, दोघांना अटक
क्राईम

मुंबई विमानतळावर 2.67 कोटी रुपयांचे सोने जप्त, दोघांना अटक

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या  मुंबई विभागाने 2.67 कोटी रुपयांचे सोने केले जप्त, मुंबई विमानतळावर तस्करी प्रकरणात दोघांना अटक

मुंबई – येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3,350 ग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची किंमत तब्बल 2.67 कोटी रुपये इतकी आहे. या तस्करी प्रकरणात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक कनिष्ठ कर्मचारी आणि ग्राहक सेवेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेचा अटक केलेल्यात समावेश आहे.

विशिष्ट गोपनीय  माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वारावर ग्राहक सेवेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेला थांबवले असता त्यावेळी तिच्याकडे द्रव्य स्वरूपात लपवून ठेवलेले सोने आढळले.

तपासात  समोर आले की, विमानतळावरील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याने ‘इवाय 200’ या विमानाच्या वेस्ट कार्टमधून सोने बाहेर काढून ते एका महिला कर्मचाऱ्याकडे दिले. जेणेकरून ती महिला तिचा विमानतळ प्रवेश परवाना (एइपी) वापरून ते सोने बाहेर नेऊ शकेल. या दोन्ही व्यक्तींना सीमाशुल्क कायदा , 1962 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading