July 27, 2024
Stormy Rains in four days
Home » वळवाच्या सरींची शक्यता
काय चाललयं अवतीभवती

वळवाच्या सरींची शक्यता

‘रेमल ‘ चक्रीवादळाच्या अवशेषाच्या परिणामा मुळे वातावरणीय घडामोडीतून, जरी मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळाच्या टोकावर ३० मे रोजी पोहोचला.

माणिकराव खुळे

सोमवार दि. ३ जून पासून आठवडाभर म्हणजे शुक्रवार १० जूनपर्यन्त महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली ह्या ९ जिल्ह्यात फक्त पूर्व मोसमी गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवते.

महाराष्ट्रातील उर्वरित २७ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी फक्त किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र ढगाळ वातावरणसह पुढील ३ दिवस दमटयुक्त उष्णतेचाही अनुभव येईल.

येत्या ४ ते ५ दिवसात मान्सून कदाचित कर्नाटक किनारपट्टीपर्यंत पोहोचू शकतो. पण त्यानंतर त्याची प्रगती कदाचित धिम्या गतीनेही होवु शकते असे वाटते.
                  ‘रेमल ‘ चक्रीवादळाच्या अवशेषाच्या परिणामा मुळे वातावरणीय घडामोडीतून, जरी मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळाच्या टोकावर ३० मे रोजी पोहोचला असला तरी, महाराष्ट्रात तो सरासरीच्याच तारखेला म्हणजे मुंबईत १० जून दरम्यानच पोहोचण्याची शक्यता जाणवते.
                
सध्याची एकंदरीत वातावरणीय स्थिती पाहता,  पूर्वमोसमी व मान्सूनच्या सरींच्या शक्यतेनुसार महाराष्ट्रात शेतकऱ्यांना खरीप पेर तयारीसाठी शेतमशागती व त्यानंतर पेरणीसाठीच्या आवश्यक जमीन ओलीसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारण २० जून दरम्यान पर्यंतही कदाचितवाट पहावी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे वाटते.               

माणिकराव खुळे

शासनाने जाहीर केलेले मान्सूनच्या संदर्भातील पत्रक –

नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, ईशान्य भारताचा बहुतांश भागही व्यापला

नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती :

  • नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला असून संपूर्ण नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा, मेघालय आणि आसामच्या बहुतांश भागांसह ईशान्य भारताचा बहुतांश भागही त्याने व्यापला. नैऋत्य मोसमी पाऊस 30 मे 2024 रोजी केरळमध्ये दाखल झाला. येत्या 2-3 दिवसात, मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप क्षेत्र आणि केरळचा उर्वरित भाग, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू, नैऋत्य आणि मध्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, आसाम आणि मेघालयाचा उर्वरित भाग, हिमालयालगत पश्चिम बंगाल आणि  सिक्कीमच्या काही भागात  तो दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. उत्तर प्रदेश आणि लगतच्या भागात चक्रीय अभिसरण असून वरून खालच्या तपावरण स्तरावर पश्चिम बंगालपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे.  त्यामुळे पुढील 5 दिवसात बिहार, झारखंड, गंगीय पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड येथे आणि 1 ते 3 जून या कालावधीत मध्य  प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात  गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.  गुजरात राज्यात 30 आणि 31 मे रोजी जोरदार भूपृष्ठीय  वारे (30-40 किमी प्रतितास वेगाने) वाहण्याची शक्यता आहे. 
  • भारतीय वेळेनुसार गेल्या 24 तासांमध्ये नोंदवलेले हवामान:
  • पंजाबच्या बहुतांश भागात, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये; राजस्थान, बिहार, पूर्व मध्य प्रदेशच्या काही भागात; ओडिशा, झारखंड येथे तुरळक ठिकाणी उष्ण ते तीव्र उष्णतेची लाट राहिली. छत्तीसगड, विदर्भ, हिमाचल प्रदेशच्या काही भागात, पश्चिम मध्य प्रदेशच्या तुरळक भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती राहिली. 
  • कमाल तापमान निरीक्षण आणि पुढील 5 दिवसांचा अंदाज:
  • 42° सेल्सिअसपेक्षा अधिक  कमाल तापमान असलेले क्षेत्रः  हरियाणा-चंदीगड-दिल्लीच्या बहुतांश भागात, पश्चिम राजस्थानच्या अनेक भागात; पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागात आणि पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा येथे तुरळक ठिकाणी काल  कमाल तापमान 46-50°सेल्सिअस दरम्यान नोंदवले  गेले.  पुढील 5 दिवसात वायव्य आणि मध्य भारतात कमाल तापमानात  हळूहळू 2-4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.पुढील 3 दिवसात महाराष्ट्र आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात कमाल तापमानात 2-3° सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

‘ अविनाशपासष्टी ‘ : सामाजिक मन:स्थितीचे वर्तमान चित्रण

पक्ष्यांचे आकारमान घटतेय, मात्र पंखांची लांबी वाढतेय…

दूधराज…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading