आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे
मोबाईल – 9423217495
अमोल कुटेः यंदा मोसमी वाऱ्यांच्या हंगामात सोलापूर, बारामती, धारशिवसह लेट खरीप किंवा रब्बी पट्ट्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. तुलनेने सह्यादी पर्वताचा पूर्व उतार, पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. हे कशामुळे झाले असावे ? शास्त्रीय कारणे काय असावीत?
माणिकराव खुळे : एकदम बरोबर आहे. धाराशिव, सोलापूरच्या जोडीला लातूर, परभणी, सांगली, कोल्हापूर, जळगांव अशीही जिल्हे आहेत कि, काहीसा कमी तरी पण बऱ्यापैकी पाऊस आहे. नाशिक, धुळे, नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात पाऊस कमी आहे.
हवामान शास्त्राच्या ज्ञान-आधारित कसोटीवर विचार केला तर, सर्व अचंबितच करणाऱ्या गोष्टी वाटतात. विशेषतः सर्व प्रणल्यायुक्त वातावरण हे १०० टक्के पावसाचे आहे, तर पाऊस होत आहे, फक्त १० टक्केच. सर्व प्रणाल्या असूनही पाऊस नाही. आणि जो आहे, तो अनपेक्षित (एप्रिल, मे, सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यासारखा) असा उष्णता संवहनी प्रक्रियेतील पाऊस पडत आहे. आणि ही अवस्था मान्सूनच्या कमकुवतपणामुळे व विशेषतः हा प्रकार वर्षाच्छायेच्या जिल्ह्यातच अधिक घडत आहे. मान्सून घाट सोडून खाली येण्यास तयार नाही. हेच एकमेव कारण आहे. दुसरे नाही.
अमोक कुटेः सोलापूरसह वरील जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक का आहे.? यावर काही सांगता येईल का ?
माणिकराव खुळे : त्या जिल्ह्यांच्या स्थानिक भौगोलिक रचनेतून व त्यांना पूरक असे २०२४ च्या वर्षातील मान्सूनचे वर्तन तसेच ज्या कालावधीत पाऊस झाला त्यावेळेस इतर राज्यात पण ह्या जिल्ह्यांच्या लगतच्या तीन उपविभाग मंडळात म्हणजे उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा, व पश्चिम मध्य प्रदेश मध्ये तेथे त्यावेळी अतिजोरदार पावसाच्या प्रणाल्या होत्या. त्या प्रणल्यांच्या प्रेरित परिणामातून त्या विशिष्ठ जिल्ह्यात ह्यावर्षी आतापर्यंत समाधानकारक नव्हे, पण ठिक असा पाऊस झाला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
